Karnataka Jail Escape Plot : कर्नाटकच्या परप्पन अग्रहार तुरुंगात असलेल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवादी नासिरला तुरुंगातून पळून जाण्यासाठी कट रचल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेले परप्पन अग्रहार तुरुंगातील मानसोपचारतज्ज्ञ नागराज, सहाय्यक उपनिरीक्षक चांद पाशा आणि संशयित दहशतवाद्याची आई फातिमा या तिघांना अटक केली आहे. या तिघांकडे केलेल्या कट उघडकीस आला आहे.
दहशतवाद्यांच्या (Terrorist) एका गटाने तुरुंग अधिकाऱ्यांच्या मदतीने, कडक सुरक्षा असलेल्या परप्पन अग्रहार तुरुंगात असलेल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवादी नासिरला बाहेर काढण्यासाठी ग्रेनेड स्फोटाचा वापर करण्याचा कट रचला होता आणि याचा 'एनआयए' अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. नासिर 2009पासून परप्पन अग्रहार तुरुंगात कैदी आहे. दहशतवाद्यांनी त्याला तेथून पळवून नेण्याचे दोन अयशस्वी प्रयत्न केले होते.
एखाद्या चित्रपटाला शोभेल, अशा पद्धतीने दहशतवादी नासिरला तुरुंगातून पळून जाण्यासाठी कट रचण्यात आला होता. त्यामागील मुख्य सूत्रधार चांद पाशा होता. नासिरला न्यायालयात नेण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती.
याचदरम्यान, पोलिसांचे (Police) लक्ष विचलित करण्यासाठी आणि नासिरला पळून जाण्यासाठी रस्त्याच्या मधोमध एक ग्रेनेड स्फोट करायचा डाव होता. ही सर्व माहिती फातिमामार्फत दहशतवादी जुनैदला दिली जात असल्याचे 'एनआयए'ला आढळून आले आहे.
कट रचणाऱ्यांना फरार दहशतवादी जुनैदने ग्रेनेड पुरवले होते. 2023मध्ये 'सीसीबी'च्या छाप्यादरम्यान, कोडीगेहळ्ळी इथल्या घराच्या कपाटात चार ग्रेनेड सापडले. त्यामुळे दहशतवाद्यांचा कट फसला.
जुनैद, मोहम्मद अर्शद खान, सुहेल, फैजल, तबरेज आणि मुदासीर यांनी कट रचला आणि 'एएसआय' चांद पाशा यांनी त्यांना मदत केली. दरम्यान, चांद पाशा याला सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली असून, 'एनआयए'ला पुढील तपास सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.