NALSAR University convocation news : देशाच्या सरन्यायाधीशांच्या विधी शाखेची पदवी मिळणे, हे खरंतर विद्यार्थ्यांसाठी दुग्धशर्करा योग म्हणता येईल. पण हैदराबाद येथील नॅशनल अॅकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च (NALSAR) या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हातून पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
विद्यापीठाच्या पदवी प्रधान समारंभासाठी प्रशासनाकडून सरन्यायाधीशांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाला विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या एका गटाने जोरदार विरोध केला आहे. पदवी मिळणार असलेल्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, प्रशासनासह प्राध्यापकांना एक पत्र लिहिले असून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
पत्रामध्ये विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांचे कॉक्रोचबाबतचे विधान तसेच दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज व्हिडिओ पाहण्यास वेळ नसल्याबाबतच्या विधानावरून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पत्रात म्हटले आहे की. या विधानांमुळे सरन्यायाधीश आमच्या सारख्या विद्यार्थ्यांबाबत उदासीन दिसून आले. अशा स्थितीत त्यांना आमच्या संस्थेत निमंत्रित करणे आणि त्यांच्या हातून पदवी घेणे, हे आम्हाला योग्य वाटत नाही. आमच्यासाठी ही पदवी शैक्षणिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्याही महत्वाची आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यांनुसार, सरन्यायाधीशांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करणे म्हणजे घटनात्मक उत्तरदायित्व आणि शैक्षणिक स्वातंत्र्याच्या मूल्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे निमंत्रणावर पुनर्विचार करावा. विद्यापीठाने ही केवळ एका वर्गाची नव्हे तर पदवीच्या सर्व विद्यार्थ्यांची मागणी असल्याचे समजून त्यावर विचार करावा. दरम्यान, याबाबत अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कॉक्रोचबाबतच्या विधानानंतरच अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियात कॉक्रोच जनता पार्टीची सुरूवात केली. अत्यंत कमी कालावधीत ही पार्टी तरूणाईसाठी एक चळवळ बनली. त्यातूनच जंतरमंतर आंदोलन झाले आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनाने देशातील तरुणाईची ताकद मागील काही दशकांनंतर पहिल्यांदाच जगासमोर आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.