Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चांना राज्यात ऊत आला आहे. पण आता शरद पवारांच्या पक्षाच्या भूमिकेबाबत एक महत्वाचा खुलासा झाला आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यानं याबाबत माहिती दिली असून जयंत पाटील यांच्यासोबत भेटीतला तपशीलही त्यांनी सांगितला आहे.
गेल्या काही दिवसांत जयंत पाटील यांनी भाजपच्या विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची चर्चा होती. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे तसंच एकनाथ शिंदे यांची विविध ठिकाणी भेट झाली होती. त्यामुळं आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यावर नुकतेच शरद पवार यांनी स्पष्टीकरणं दिलं तसंच जयंत पाटील यांनी देखील याचा इन्कार केला होता.
पण आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीच्या एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. यासाठी त्यांनी नुकतीच आपली जयंत पाटील यांची भेट झाली आणि या भेटीत यासंदर्भात चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी जयंत पाटील यांनी या चर्चांवर खुलासा केल्याची माहितीही नाना पटोले यांनी दिली आहे.
नाना पटोले म्हणाले, "सध्या काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीसोबत असलेली शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपप्रणित एनडीएसोबत जाण्यासाठी उत्सुक असल्याच्या चर्चा आपण माध्यमांमधून ऐकत आहोत. काल माझी जयंत पाटील यांच्याशी देखील यावर चर्चा झाली. जयंत पाटील सांगत होते की, आम्ही जाणार नाही आम्ही इंडिया आघाडीसोबत राहणार आहोत. त्यामुळं या केवळ चर्चाच आहेत त्यामुळं मला वाटतं की, यावर जास्त चर्चा करण्याचं काही कारण नाही. या केवळ अफवाच असल्यानं अजित पवार गट किंवा शरद पवार गट यांच्या पक्षाच्या विलिनिकरणाचा विषय हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला असल्यानं काँग्रेसनं त्यामध्ये खूप जास्त भाष्य करावं असं मला वाटतं नाही"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.