📝 3-पॉईंट सारांश:
नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडला – सतत सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम नरेंद्र मोदींनी 25 जुलै 2025 रोजी मोडला.
बिगर काँग्रेसी सर्वाधिक काळ सत्तेत – मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातील बिगर काँग्रेसी आणि बिगर हिंदी राज्यातील सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले पहिले नेते आहेत.
सलग निवडणुकीतील यश – मोदींनी सलग 6 निवडणुका जिंकल्या असून, लोकसभा व विधानसभा पातळीवरही नेतृत्व टिकवले आहे.
Narendra Modi breaks Indira Gandhi's record: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडला आहे. आतापर्यंत सलग सर्वाधिक काळ (१६ वर्षे २८६ दिवस) पंतप्रधान राहण्याचा विक्रम जवाहरलाल नेहरूयांच्या नावावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतर जन्मलेले बिगर हिंदी राज्याचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले पंतप्रधान ठरले आहेत.
२६ मे २०१४ पासून नरेंद्र मोदी'पंतप्रधान' पदावर विराजमान आहेत. मोदी हे देशाचे दुसरे पंतप्रधान बनले आहेत जे सर्वात जास्त काळ या पदावर आहेत. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर 25 जुलै 2025 रोजी म्हणजेच आज नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले पंतप्रधान ठरले आहेत.मोदींनी इंदिरा गांधी यांचा सतत पंतप्रधान राहण्याचा विक्रम मोडला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांनी २४ वर्षे सरकारचे नेतृत्व केले आहे.
नरेंद्र मोदी हे देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान असून सर्वात जास्त काळ बिगर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून काम करणारे ते पंतप्रधान आहेत. सलग दोन वेळा निवडून येणारे पहिले आणि एकमेव बिगर काँग्रेसी पंतप्रधान होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवून सरकार स्थापन करणारे पंतप्रधान मोदी हे पहिले आणि एकमेव बिगर काँग्रेसी नेते आहेत.
इंदिरा गांधी (१९७१) यांच्यानंतर पूर्ण बहुमताने पुन्हा निवडून येणारे ते पहिले पंतप्रधान आहेत.
पंडित नेहरू यांच्या शिवाय एका पक्षाचे नेते म्हणून सलग तीन सार्वत्रिक निवडणुका जिंकणारे ते एकमेव पंतप्रधान आहेत.
सर्व पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ते एकमेव नेते आहेत ज्यांनी एका पक्षाचे नेते म्हणून सलग सहा निवडणुका जिंकल्या आहेत.
2014, 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या, त्यानंतर 2002, 2007 आणि 2012 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुका जिंकल्या.
4 महत्त्वाच्या प्रश्नोत्तरांसह (FAQs)
प्रश्न: नरेंद्र मोदींनी कोणाचा विक्रम मोडला?
उत्तर: त्यांनी इंदिरा गांधींचा सतत पंतप्रधान राहण्याचा विक्रम मोडला.
प्रश्न: नरेंद्र मोदी किती काळापासून पंतप्रधान आहेत?
उत्तर: 26 मे 2014 पासून ते सलग पंतप्रधानपदावर आहेत.
प्रश्न: नरेंद्र मोदी कोणत्या पक्षाचे पहिले बिगर काँग्रेसी नेते आहेत?
उत्तर: ते भाजपचे नेते असून पहिले बिगर काँग्रेसी नेते आहेत ज्यांनी पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले.
प्रश्न: नरेंद्र मोदींनी एकूण किती निवडणुका सलग जिंकल्या आहेत?
उत्तर: त्यांनी सलग सहा निवडणुका जिंकल्या – तीन लोकसभा आणि तीन गुजरात विधानसभा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.