Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
देश

`पुढची शंभर वर्षे काॅंग्रेस सत्तेवर येणार नाही, असे त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यांवरून दिसतयं`

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : यातील अनेकांच्या घड्याळाचा काटा 2014 मध्ये अडकलाय. त्यातून ते बाहेरच पडत नाहीत. याचा त्यांना फटका बसलाय. पण तरी त्यांना ते समजत नाही. त्यांचा अहंकार जात नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काॅंग्रेसवर (Congress) केली. या पक्षाचे नेते अशी विधाने करत आहेत की त्यामुळे काॅंग्रेस पुढची 100 वर्षे सत्तेत येणार नाही, असे दिसतयं. आता काॅंग्रेसवाल्यांनाच असे वाटत असेल तर ठिक आहे मी पण आता तसेच मानायला तयार आहे, असा टोला त्यांनी लगावला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तराचे भाषण देताना मोदी यांनी काॅंग्रेसला चिमटे काढले. गेल्या काही वर्षांत देशात वेगाने विकास झाला. पण तो काॅंग्रेसला दिसत नाही. ते येथे एवढा उपदेश करतात पण 50 वर्षे तेच सत्तेवर येथे होते, हे ते विसरतात. उज्वला गॅस योजना, पंतप्रधान आवास योजना यामुळे देशातील गरिबांना सन्मान मिळाला. पण त्याची जाणीव येथे सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना नाही, असा टोला त्यांनी लगावला.

काॅंग्रेसला त्यांच्या अहंकारामुळे जनतेने अनेक ठिकाणी नाकारले आहे. तरी त्यांना ते उमजत नाही. नागालॅंडच्या जनतेने 1998 मध्ये काॅंग्रेसला शेवटचे सत्तेवर आणले. ओरिसात 1997 नंतर काॅंग्रेसला तेथे एंट्री नाही. गोव्यता 1994 मध्ये काॅंग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले. त्याला 28 वर्षे झाली. त्रिपुरामध्ये 1988 नंतर काॅंग्रेसला सत्ता मिळाली नाही.उत्तर प्रदेशात 1985 मध्ये काॅंग्रेसला सत्ता मिळाली. त्यानंतर काॅंग्रेस तेथून हद्दपार झाली. पश्चिम बंगाल 1972 मध्ये काॅंग्रेसला सत्ता मिळाली होती. मात्र 50 वर्षांनंतर तेथे काॅंग्रेसला स्थान मिळाले नाही. तमिळनाडूत 1962 मध्ये शेवटची सत्ता मिळाली होती. तेलंगणा बनविण्याचे श्रेय काॅंग्रेस घेते पण तेथेही तुम्हाला जनतेने सत्ता मिळाली. झारखंडमध्येही मागच्या दरवाजाने काॅंग्रेस सत्तेत आहे. एवढ्या मोठ्या लोकशाहीत देशातील जनतेने काॅंग्रेसा का नाकारत आहे, याचा ते विचार करत नाही. जनतेने तेथे वेगळा पर्याय निवडला. तेथे जनतेने पुन्हा काॅंग्रेसला प्रवेश दिला नाही, अशी आकडेवारीच त्यांनी सांगितली.

आम्ही एक निवडणूक हरलो तरी आमच्याविरोधात टीका केली जाते. पण इतक्या वेळी काॅंग्रेस हरले पण तुमचा अहंकार जात नाही. येथील इकोसिस्टीम आणि त्यांचे स्तुतिपाठक काॅंग्रेसच्या पराभवावर बोलत नाही. पण त्यांना उत्तर देण्याची आमची जबाबदारी आहे, असे सांगत मोदी यांनी एक कविता ऐकवली.

ओ जब दिन को रात कहे

तो तुरंत मान जाय

नही मानोगे तो दिन मे नकाब ओढेंगे

जरूरत हूई ती हकिकत को तरोडमरोड देंगे

ओ मगरूर हेै

इन्हे ऐना मत दिखाओ

ओ ऐनेको भी तोड देंगे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT