India blocks Pakistan’s Social Media Account account Sarkarnama
देश

Pakistani Social Media Account : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानवरील डिजिटल स्ट्राईक मागे? एक दिवसात सरकारला आली जाग!

Narendra Modi Pakistan Social Media : भारत सरकारकडून कोणतेही अधिकृत निवेदन पाकिस्तान सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्यासंदर्भात करण्यात आलेले नाही.

Roshan More

Pakistan Social Media : पहलगामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये भारतातील तब्बल 27 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. पाकिस्तामधून आलेल्या दहशतवाद्यांविरोधात भारतातने कठोर पावले उचलत ऑपेरशन सिंदूर राबवले. त्यानंतर दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठोर पावले उचलत पाकिस्तान मधील सोशल मीडिया अकाऊंटवर भारतात बंदी घातली होती.

नरेंद्र मोदींच्या या पावलाचे पाकिस्तानवर सोशल मीडिया स्ट्राईक म्हणून कौतुक करण्यात आले. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे.पण सोशल मीडियावर स्ट्राईक कायम असल्याचे सांगितले जात होते. मात्र, पाकिस्तानी कलाकारांची सोशल मिडिया अकाऊंट आणि युट्यूब चॅनल पुन्हा भारतात दिसत असल्यामुळे पाकिस्तानवर सोशल मीडिया स्ट्राईक मागे घेतले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारत सरकारकडून कोणतेही अधिकृत निवेदन पाकिस्तान सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्यासंदर्भात करण्यात आलेले नाही. त्यामुळे अधिकृत घोषणा न करता ही बंदी हटवली गेली का? असे देखील बोलले जात आहे.

एका दिवसात पुन्हा बंदी

बुधावरी पाकिस्तानी कलाकार, सेलिब्रिटींचे अकाउंट्स पुन्हा एकदा भारतात दिसू लागले होते. त् सोशल मीडिया बंदी उठवण्यात आली असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे भारतीय सोशल मीडिया युजर्सने सरकारवर टीका केली. त्यानंतर गुरुवारी सकाळपासून पाकिस्तानी सेलिब्रिटींचे अकाऊंट पुन्हा दिसने बंद झाले. भारतीय यूजर्सना इंस्टाग्रामवर 'हे अकाउंट भारतात उपलब्ध नाही. कारण आम्ही या सामग्रीवर बंदी आणण्याच्या कायदेशीर विनंतीचे पालन केले आहे.', असे मेसेज पाकिस्तानी अकाऊंटवर दिसत होते. त्यामुळे पाकिस्तान अकाऊंट पुन्हा एक दिवसात बंद करण्यासाठी जाग आल्याचे सोशल मीडिया युजर्स म्हणत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT