Narendra Modi Sarkarnama
देश

Onion Export : शेतकऱ्यांसाठी खूषखबर! निवडणूक आली; केंद्राने कांदा निर्यातबंदी हटवली

BJP Politics : कांदा निर्यादबंदीमुळे भाजप आमदार-खासदारांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले

Sunil Balasaheb Dhumal

BJP Political News : लोकसभा निवडणुकीचे पडघम कधीही वाजण्याची शक्यता आहे. या पर्श्वभूमीवर केंद्र सरकारने नाराज शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कांद्यावर असलेली निर्यातबंदी केंद्राने हटवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातीला मंजुरी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह भाजप आमदार-खासदारंनाही मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

केंद्र सरकारने देशातील कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी निर्यातीवर बंदी घातली होती. ही निर्यातबंदीची डेडलाईन ३१ मार्चपर्यंत होती. दरम्यान, शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात नाराजी वाढली होती. परिणामी भाजप (BJP) नेत्यांकडूनही कांद्यावरील बंदी हटवण्याची मागणी करण्यात येत होती. जवळ आलेली निवडणूक आणि शेतकऱ्यांचा वाढलेला रोष पाहून ३१ मार्चपूर्वीच सरकारने ही बंदी हटवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर (Onion Export) 40 टक्के निर्यात कर लावल्याने राज्यात विशेष करून कांदा पट्टा असलेल्या नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला होता. शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा नाफेडच्या माध्यमातून प्रति क्विंटल दोन हजार 410 रुपयाने खरेदी करण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार कांदा खरेदी झाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. परिणामी आगामी निवडणुकांत कांदाप्रश्न सरकारला रडवणार, असे बोलले जात होते. त्याचा फटकाही भाजपसह महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांना बसला होता. या पार्श्वभूमीवर आणि लोकसभा (Loksabha) निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारचा कांदा निर्यातबंदी मागे घेतल्याचा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

तीन लाख मेट्रिक टन कांदा होणार निर्यात

यापूर्वीच्या अनेक अहवालांमध्ये केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याचा विचार करत असल्याचे अपेक्षित होते. कांदा उत्पादक भागातील कांदा आणि इतर भाज्यांचे भाव कोसळणे हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले. आता केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये 50 हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT