Narendra Modi  Sarkarnama
देश

Narendra Modi Oath Ceremony : Modi 3.0 मध्ये 'या' सहा माजी मुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ

Narendra Modi Oath Taking Ceremony : पीएम नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, निर्मला सीतारमन, पीयूष गोयल यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

Sachin Waghmare

Modi 3.0 cabinet : नरेंद्र मोदी (Modi 3.0 Cabinet) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पीएम नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, निर्मला सीतारमन, पीयूष गोयल यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

त्यांच्यासोबतच महाराष्ट्रातून सहा जणांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मोदी (Narendra Modi) सरकारच्या या तिसऱ्या टर्ममध्ये देशातील सहा माजी मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. (Narendra Modi Oath Ceremony)

मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh), मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी या देशातील सहा माजी मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

त्यासोबतच यावेळी 30 जणांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी नितिन गडकरी, पियुष गोयल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली तर स्वतंत्र पदभार म्हणून शिवसेनेचे खासदार प्रताप जाधव (Pratap Jadhav) यांनी शपथ घेतली. तर केंद्रीय राज्यमंत्री पदाची रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले यांनी शपथ घेतली.

भाजपच्या 20 दिग्गजांना वगळले

दरम्यान, मोदी सरकार 2.0 मध्ये अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळालेल्या भाजपच्या 20 दिग्गजांना वगळण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची नावे संभाव्य मंत्र्यांच्या यादीतून गायब झाले आहेत. त्यामध्ये राज्यातील नारायण राणे (Narayan Rane), भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही.

SCROLL FOR NEXT