नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४०० अब्ज डॉलर्स व्यापारी माल नियार्तीचे लक्ष्य गाठून, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने परदेशातील सर्व मिशन्सना केवळ 3 टी या आधारावर सर्व अधिकाऱ्यांचे मूल्यांकन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ट्रेड, टेक्नॉलॉजी आणि टूरिझम हे तीन टी आहेत. या पार्श्वभूमीवर आता मोदींनी राजदुतांनाही निर्यात वाढविण्याचे लक्ष्य दिले आहे.
याबाबत परराष्ट्रीय मंत्र्यालयाने सर्व राजदूत आणि मिशन प्रमुखांना पत्र पाठवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निर्यात वाढविण्यासाठी या माध्यमातून मोहीम सुरू केली आहे. या 3 टीवर अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यामापन होणार आहे.
दूतावासातील (ambassadors) सर्व अधिकाऱ्यांचे वार्षिक मूल्यांकन मोठ्या प्रमाणावर त्यांच्या 3 टी वरील कामगिरीवर केले जाईल ज्यात राजदूताचा समावेश आहे. भारत ४०० अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट ३१ मार्च २०२२ पर्यंत गाठेल, अशी अपेक्षा आहे.
याबाबतचे पत्र सर्व राजदूत आणि मिशन प्रमुखांना परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनी पत्र पाठवले आहे. ''अधिकाऱ्यांनी ३ टी वाढवण्याचे काम एखाद्या टीमप्रमाणे करावे,'' अशा सूचना या पत्रात करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ३३४ अब्ज डॉलरची व्यापारी निर्यात भारताने केली आहे. या नव्या सूचनांमुळे भविष्यात, एखाद्या अधिकाऱ्याला जगभरात पोस्टिंग मिळण्याची शक्यता कमी होईल कारण प्राधान्य क्षेत्र ओळखले जाणार आहे. त्यामुळे मागील अनुभव भविष्यातील पोस्टिंगची गुरुकिल्ली ठरेल.
मिशन फोकस 3 टी वर असतानापरदेशात असाइनमेंटच्या निकषांमध्ये बदल करणार
सेवा देत आहेत किंवा सेवा देणार आहेत त्या संबंधित देशाच्या भाषा भाषिकांना आणि तज्ज्ञांना प्राधान्य दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.