PM Narendra Modi Birthday Sarkarnama
देश

PM Narendra Modi Birthday : नरेंद्र मोदींचा वाढदिवस; समर्थकांसह विरोधकांनीही दिल्या अनोख्या शुभेच्छा...

Chetan Zadpe

Delhi News : सलग दोन वेळा पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आज ७३ वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसाचे निमित्त साधून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. वाढदिवसानिमित्त मोदींवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एरव्ही मोदींवर टीका करणा-या विरोधकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Latest Marathi News)

काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गेंनीही मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. खर्गे ट्विट करत म्हणाले, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो', असं ट्विट खर्गे यांनी केलं आहे.

नरेंद्र मोदी यांच्या आजच्या वाढदिवसाचं निमित्त साधून भाजपने देशभरात विविध कार्यक्रमांची नियोजन केले आहे. भाजप मोदींचा वाढदिवस जनसेवा सप्ताह म्हणून साजरा करणार आहे. २ ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत 'आयुषमान भवः' ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

Edited By - Chetan Zadpe

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT