Sanjay Raut addressing media on the Nari Shakti Bill, criticizing the government over women reservation policy and political motives. Sarkarnama
देश

Nari Shakti Bill : 'नारीशक्ती नव्हे, भाजपशक्ती विधेयक; आम्ही ते संसदेत मंजूर होऊ देणार नाही, कारण...', मतदानापूर्वीच विरोधी खासदाराने सांगितलं मतांचं गणित...

Women Reservation India Politics : २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून महिला आरक्षण लागू करण्याच्या उद्देशाने हे विधेयक मांडण्यात येणार आहे. या विधेयकातून महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिलं जाणार आहे. यासाठी संविधानात दुरुस्ती केली जाणार आहे.

Jagdish Patil

Nari Shakti Bill : केंद्र सरकारने बहुचर्चित 'नारी शक्ती वंदन अधिनियम' हे महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक लागू करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनाला गुरूवारपासून (ता.१५) सुरुवात होत असून ते दोन दिवस चालणार आहे.

२०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून महिला आरक्षण लागू करण्याच्या उद्देशाने हे विधेयक मांडण्यात येणार आहे. या विधेयकातून महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिलं जाणार आहे. यासाठी संविधानात दुरुस्ती केली जाणार आहे. या दुरुस्तीमुळे लोकसभेतील सदस्यांची संख्या ५४३ वरून ८५० पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

तर आता याच विधेयकावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. 'हे नारीशक्ती विधेयक नव्हे तर भाजपशक्ती विधेयक,' असल्याचं वक्तव्य राऊतांनी केलं आहे. शिवाय याचवेळी त्यांनी हे बिल सहज मंजूर होईल या भ्रमात कोणीही राहू नये, असा इशारा देखील सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

विशेष अधिवेशन विधेयका संदर्भात बोलातना संजय राऊत म्हणाले, "हे विधेयक सप्टेंबर २०२३ साली मंजूर झाले आहे. केंद्र सरकार देशाला फसवतंय. जे विधेयक मंजूर झालेय, त्या विधेयकात जनगणनेबाबत काही महत्त्वाच्या सूचना होत्या. त्यावर चर्चा केली नाही. २०११ नुसार विधेयक लागू होईल, असं सांगण्यात आलं.

जर महिलांना ३३ टक्के आरक्षण सध्या जे ५४३ खासदारांचे बळ आहे, त्यात द्या, आम्हाला काही हरकत नाही", असं राऊतांनी स्पष्ट केलं. मात्र, ८०० पेक्षा जास्त खासदार तुमच्या मनाप्रमाणे मतदारसंघ तोडून निर्माण करून तुम्हाला हे बिल लादायचे आहे. त्याला आमचा विरोध आहे. हे नारीशक्ती विधेयक नसून हे भाजपशक्ती विधेयक आहे. हे विधेयक आम्ही संसदेत मंजूर होऊ देणार नाही, असं राऊत म्हणाले.

शिवाय केंद्र सरकारचा हा डाव असून पाच राज्यात निवडणूका असताना हे विधेयक आणण्याची गरज नव्हती. महिला आरक्षण विधेयक मंजूर करताना जे कारस्थान हे सरकार करत आहे, त्यांनी इतिहासाच्या गोष्टी करू नये. मतदानातून हे बिल पाडले जाईल. या क्षणी सरकारचा आकडा २९२ आहे. तो फार तर ३०० होईल.

आम्ही सगळे एकजुटीने काम करत आहे. समाजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसचा आकडा मोठा आहे. काँग्रेसच्या शंभरच्या आसपास जागा अलून राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून 17 ते 20 च्या आसपास जागा आहेत. त्यामुळे हे विधेयक सहज मंजूर होईल या भ्रमात कोणीही राहू नये, असा इशाराही राऊतांनी केंद्र सरकारला दिला आहे. त्यामुळे आता संसदेत हे विधेयक मंजूर होणार की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT