BJP News
BJP News  Sarkarnama
देश

BJP News : नऊ राज्य जिंकण्यासाठी भाजपची रणनीती ठरली ; साडेतीन हजार संघटक मैदानात उतरणार

सरकारनामा ब्युरो

lok sabha Election 2024 : देशात या वर्षी नऊ राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. भाजपने पक्षाला मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. पक्षाची ध्येयधोरणं तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी पक्षश्रेष्ठी रणनीती आखत आहेत.

त्यासाठी भाजपने साडेतीन हजार संघटकांची नेमणूक केली आहे. हे संघटक राज्या-राज्यात जाऊन पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या संघटकांची नुकतीच बैठक झाली. नऊ राज्यातील विधानसभा आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी हे संघटक मैदानात उतरले आहेत.

या वर्षी मेघालय, नागालॅड, मिजोरम, त्रिपुरा, कर्नाटक, तेलंगना, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ येथे विधानसभा निवडणुक होत आहे. नऊपैकी सहा राज्यात भाजप-मित्रपक्षाचे सरकार आहे. तर राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तेलगंना येथे राष्ट्र समितीचे सरकार आहे.

साडेतीन हजार संघटक विधानसभा, लोकसभा मतदार संघात काम करणार आहे. आपल्या कार्याचा अहवाल हे संघटक केंद्रीय नेतृत्वाला देणार आहेत.

भाजपने तेलगंना येथे सर्व ११९ विधानसभासाठी संघटक प्रचारात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व समाजाला आपल्या सोबत घेण्यासाठी, त्यांच्यासाठी हे संघटक संवाद साधणार आहेत.

भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने मार्च-एप्रिलमध्ये 'गांव-गांव चलो, घर-घर चलो'ही मोहीम सुरु करणार आहेत, हरियाणामध्ये ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. जानेवारीअखेर प्रत्येक गावात दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात भाजपच्या मिशन 45 राबविणार आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्लॅन बनवत असतानाच भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्यानं केलेल्या दाव्यामुळे शिंदे गटाचे पुन्हा टेन्शन वाढले आहे. भाजपनं मिशन 45 सुरु केलं आणि इतर पक्षाचे दाबे दणाणून गेले आहे.

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना सध्या युतीत आहे पण नेमकं हे मिशनं आहे तरी कसं? बाळासाहेबांच्या शिवसेनेचं काय होणार याचीच चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला 45 खासदार हवेयत. भाजप शिंदेसोबत सत्तेत आहे. मग शिंदेच्या खासदारांचं काय? अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT