Navneet Rana Latest News in Marathi
Navneet Rana Latest News in Marathi sarkarnama
देश

"नवनीत राणा आधी बारमध्ये काम करत होत्या" : राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांची जीभ घसरली

सरकारनामा ब्युरो

(Navneet Rana latest news)

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आज दिल्लीत कनॉट प्लेस परिसरातल्या हनुमान मंदिरात जावून महाआरती आणि हनुमान चालिसा पठण केले. यावेळी बोलताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली. आम्हाला घरं जाळणारं हिंदुत्व नको, तर चूल पेटवणारं हिंदुत्व हवं, असे म्हणतं शिवसेनेने आजच्या उद्धव ठाकरे यांच्या सभेचा प्रचार केला आहे.

यावरच बोलताना राणा यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, "इतकी वर्षे त्यांच्या घरातली चूल ज्यामुळे पेटली, आज तेच हिंदुत्ववाद्यांबद्दल बोलत आहेत. आजपर्यंत ज्यांच्या आशिर्वादाने, मोदींचा आशिर्वाद घेऊन शिवसेना २०१४, २०१९ मध्ये निवडून आली. पण आज खुर्चीच्या हव्यासापोटी शिवसेना त्यांच्या विरोधात उभी आहे हे सगळ्या देशाने पाहिलं आहे."

दरम्यान राणा यांच्यावर या सगळ्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी टीका केली आहे. मात्र ही टीका करताना त्यांची जीभ घसरलेली पाहायला मिळाली. त्या म्हणाल्या, "कुणीही उठसूट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा अपमान करतो, हे कितपत योग्य आहे? आणि कोण आहेत या नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांच्याबद्दल सर्वांना माहित आहे. खोटं जात प्रमाणपत्र दाखवून त्या खोट्या खासदार झाल्यात. त्यांना एवढं महत्त्व द्यायची गरज नाही. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी हे दाम्पत्य असा प्रकार करतंय."

यावेळी विद्या चव्हाण यांनी रवी राणा यांच्यावरही टीका केली आहे. चव्हाण म्हणाल्या, "राणा दाम्पत्य अमरावतीत काय करत होतं, हे सर्वांना माहित आहे. रवी राणांनी निवडणुकीच्या वेळी मतदारांना कुकर वाटले. पण कुकरला झाकणच नव्हतं. महिला त्यांना विचारायला गेल्या, तर रवी राणा म्हणाले की मला मतं दिल्यानंतर तुम्हाला झाकणं देतो. " असे म्हणत त्यांच्यावर मत मिळवण्यासाठी मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT