Odisha Politics : ओडिशामध्ये 24 वर्षांनंतर सरकार बदलण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपने, राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मोहन माझी यांची निवड केली आहे. उत्तरप्रदेश - मध्यप्रदेश-छत्तीसगड प्रमाणेच ओडिशामध्येही भाजपने एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्यूला लागू केला आहे.
ओडिशाचे दोन उपमुख्यमंत्री असणार आहे, ज्यामध्ये एक महिला आहे. पार्वती परीदा आणि केवी सिंह हे दोघे उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर मोहन माझी ओडिशाच्या राजकारणात पहिल्यांदाच मोठ्या पदावर समोर आले आहेत.
मोहन चरण माझी(Mohan Charan Majhi) ओडिशाचे 15वे मुख्यमंत्री असती, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा विधानसबा निवडणूक जिंकली होती, तेव्हा नवीन पटनायक(Naveen Patnaik) यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. 24 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर 2024मध्ये झालेल्या ओडिशा विधानसभा निडवणुकीत बीजेडीला पराभवास सामोरं जावे लागले.
भाजपने ओडिशामधील 147 जागांपैकी 78 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं. तर बीजेडीला 51 जागा आणि काँग्रेसला अवघ्या 14 जागांवर समाधान मानावं लागलं. याशिवाय अपक्षांच्या वाट्याला चार जागा गेल्या आहेत.
2024च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजप(BJP) नेते मोहन चरण माझी यांनी बीजू जनता दलाच्या मीना माझी यांचा 11,577 मतांच्या फरकाने पराभव करून, क्योंझर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
52 वर्षीय मोहन चरण माझी चारवेळा आमदार झाले आहेत. 2000 ते 2009 दरम्यान दोनदा क्योंझरचे प्रतिनिधित्व देखील केले आहे. यानंतर मग त्यांनी 2019 मध्ये भाजपच्या तिकीटावर क्योंझर येथून निवडणूक लढवली होती आणि ते विजयी झाले होते.
मोहन जरण माझी यांचा जन्म 6 जानेवारी 1972 रोजी ओडिशामधील क्योंझर येथे झाला. ते अनुसूचित जमातीमधून येतात. त्यांनी डॉ. प्रियंका मरांडी यांच्याशी विवाह केला. त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात सरपंच (1997-2000) म्हणून केली होती.
यानंतर त्यांनी वर्ष 2000मध्ये पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवली आणि विजयी झाले. भाजपने त्यांना राज्य आदिवासी मोर्चाचे सचिवही बनवले होते. याशिवाय ते राज्य एसटी मोर्चाचे सरचिटणीस आणि 2005 ते 2009 पर्यंत सरकारी उपमुख्य व्हीपही होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.