<div class="paragraphs"><p>Navjot Singh Sidhu, Harbhajan Singh</p></div>

Navjot Singh Sidhu, Harbhajan Singh

 

Sarkarnama

देश

हरभजनसिंग भाजप की काँग्रेसच्या वाटेवर? सिध्दूंनी फोटोच केला ट्विट

सरकारनामा ब्युरो

चंदीगड : क्रिकेटमध्ये आपल्या गुगलीने फलंदाजांना नाचवणारा हरभजनसिंग (Harbhajan Singh) आता राजकारणाच्या खेळपट्टीवर आपलं नशीब आजमावण्याच्या तयारी असल्याचे संकेत मिळत आहेत. मागील आठवड्यात हरभजन भाजप (BJP) मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. आता तो काँग्रेस (Congress) मध्ये जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे हरभजन नेमका कोणत्या पक्षात जाणार या चर्चेला ऊत आला आहे.

पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Punjab Assembly Election) होणार आहे. त्यासाठी काँग्रेससह सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेसमधील वाद काहीप्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे. पण सत्ता टिकवण्यासाठी यावेळी काँग्रेसला मोठी कसरत करावी लागण्याची स्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आता प्रसिध्द चेहऱ्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही दिवसांपुर्वीच प्रसिध्द गायक सिध्दू मूसे वाला काँग्रेसमध्ये दाखल झाला आहे.

आता क्रिकेटपटू हरभजनसिंग काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांनीच दोघांचा एक फोटो ट्विट करून तसे संकेत दिले आहेत. दोघांचा फोटो ट्विट करत त्यांनी एका ओळीत शक्यतांचे छायाचित्र असं म्हणत उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे हरभजन काँग्रेसमधील प्रवेश करणार, असे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

भाजपही हरभजनसिंग व युवराजसिंगला आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानेही याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते. दि दिल्ली क्राऊन या मीडिया कंपनीने एक ट्विट करत असे संकेत असल्याचे म्हटले होते. पण ते ट्विट रिट्विट करत हरभजनही ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे तो भाजपमध्ये जाणार नाही, असेच सध्यातरी दिसते.

पण सिध्दू यांच्या ट्विटमुळे तो काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याने पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अमरिंदरसिंग भाजपशी युती करणार आहेत. तसेच आप, शिरोमणी अकाली दलानेही राज्यात जोर लावला आहे. त्यामुळे सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू असल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT