Nawab Malik  sarkarnama
देश

मोठी बातमी : तब्बल ७ तासांच्या चौकशीनंतर नबाव मलिक यांना अटक

Nawab Malik | ED | NCP : नवाब मलिक यांना आज सकाळी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नबाव मलिक यांना ईडीने अटक केली आहे. तब्बल ७ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. आज सकाळी ५ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर ७ वाजता मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र चौकशीसाठी जाताना मलिक हे स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते.

अटक झाल्यानंतर मलिक यांनी नही झुकेंगे और भी लढेंगे, सबको एक्सपोज कर देंगे अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान त्यांना आता मेडिकलसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. ईडीमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड आणि मलिक यांचे थेट आणि कमी पैशात व्यवहार झाले होते. याच बाबतचे पुरावे अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सापडले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

नवाब मलिक यांची दाऊद इब्राहिम मनिलाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरु आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी ईडीने मुंबईतील काही जमीन व्यवहारांशी संबंधित अंडरवर्ल्डशी संबंधित इकबाल कासकर आणि हसीना पारकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर याच प्रकरणाशी संबंधित काही लोकांची ही चौकशी करण्यात आली होती. भाजपचे नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांच्यावर याबाबत आरोप केले होते.

दरम्यान मलिक यांच्या चौकशीमागे राजकीय सुडबुद्धी असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. नवाब मलिक किंवा आम्ही जे सातत्याने बोलत आहेत, असत्याचा पर्दाफाश करण्यात येत आहे, मुखवटे काढले जात आहेत, त्यांच्या मागे देशभरामध्ये ईडी, सीबीआय लावले जात आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT