Nawab Malik Targets Amit Shah
Nawab Malik Targets Amit Shah 
देश

ते अमित शहा नव्हेत, दिल्ली जाळणारे नादिर शाह : नवाब मलिक

सरकारनामा ब्युरो

मुंबई : दिल्ली जाळायला येणारा असे नादिर शहाला ओळखले जाते. आता अमित शहा हे नादिर शहा झाले आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. 

दिल्लीत झालेल्या हिंसाचारावून मलिक यांनी अमित शहांना लक्ष्य केले आहे. सोशल मिडिया सोडण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संकेताचेही मलिक यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले, "काही भाजप नेतेही म्हणाले आम्हीही सोशल मिडिया सोडणार. त्यांच्या भक्तांनीही सोशल मिडिया सोडला पाहिजे म्हणजे देशात शांतता राहिल,''

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. त्याचेही समर्थन मलिक यांनी केले. ते म्हणाले, "अयोध्या भूमी आता विवादात नाही. देशातील नागरिकांना मंदिरात जाण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे आपल्या धर्मानुसार अयोध्येला जात असतील तर त्यावर प्रश्न उपस्थित करायची गरज नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT