Investigate phone hack through Pegasus: Nawab Malik Sarkarnama
देश

नवाब मलिकांचा शायराना अंदाजात इशारा; अधिक आक्रमक होणार?

नवाब मलिक आता वानखेडेंच्या बाबतीत कोणता नवा गौप्यस्फोट करतात याकडे लक्ष लागले होते.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काल ट्विट करत 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त' अशी एका वाक्यात सुचक अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे ते आता वानखेडेंच्या बाबतीत कोणता नवा गौप्यस्फोट करतात याकडे लक्ष लागले होते. मात्र मलिक यांनी आता आणखी एक सुचक ट्विट करत शायराना अंदाजात अधिक आक्रमक होणार असल्याचा इशारा दिला आहे.

नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की,

रगों में दौड़ते फिरने के हम नहीं क़ायल,

जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है।

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना आज जामीन मंजूर झाला आहे. या सर्वांना मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात ३ ऑक्टोबरला सकाळी एनसीबीने (NCB) ताब्यात घेतले होते. अटकेनंतर तिघांनाही २५ दिवसानंतर जामीन मिळाला आहे. मात्र या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मलिक यांनी त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले होते. वानखेडे यांनी मुस्लिम असल्याची माहीती लपवून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवल्याचा दावा मंत्री मलिक यांनी केला आहे. तसेच वानखेडे यांच्यावर खंडणी वसूलीचेही आरोप झाले आहेत.

यावर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळत याबाबतचे उत्तर आपण न्यायालयातच देऊ असे म्हटले आहे. मात्र, आज आर्यनला जामीन मिळाल्यावर केलेल्या ट्विटरवरुन मलिक आणि वानखेडे यांचा वाद थांबणार नसुन वाढतच जाणार असल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT