Mannat Shaharukh Khan
Mannat Shaharukh Khan Twitter
देश

एनसीबीची थेट मन्नतवर धडक, शाहरुखच्या हातावर नोटीस?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एनसीबी आज पुन्हा सक्रिय झाली आहे. मात्र यावेळी त्यांनी थेट शाहरुख खानच्या (Shaharukh Khan) घरी म्हणजे 'मन्नत'वर धडक मारली आहे. यावेळी एनसीबीने शाहरुख खानला एक नोटिस देखील देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. या नोटीसीनुसार आर्यन खानजवळ जर आणखी कोणते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल तर ते जमा करण्यासाठी सांगण्यात आले आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम राबवण्यात येत आहे. तर सिंह यांनी सांगितले की, तपासाशी संबंधित काही कागदपत्रीय कामकाज बाकी होते ते पुर्ण करण्यासाठी ते 'मन्नत'वर आले होते. दरम्यान आजच शाहरुखने आर्थर रोड कारागृहात जावून आर्यन खानची भेट घेतली होती.

एनसीबीने आज बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या (Ananya Panday) घरावरही छापा टाकला आहे. मुंबईतील वांद्रेस्थित तिच्या घरावर हा छापा टाकण्यात आला आहे. या प्रकरणात अजून फारशी माहिती समोर आलेली नसली तरी असे मानले जात आहे की एनसीबीचा हा छापा 'आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी' संबंधित असू शकतो. अनन्या ही आर्यन खानची मैत्रीण आहे, आणि दोघांमधील चॅटच्या आधारे हा छापा टाकण्यात आला आहे. त्यानंतर एनसीबीने अनन्या पांडेला २ वाजता चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे. काही बातम्यांनुसार अनन्या पांडेसोबत ड्रग्स चॅटमध्ये आर्यन खानची बहिण सुहानाचेही नाव समोर आले आहे.

एनसीबीने बुधवारी आर्यन खान आणि उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग्ज चॅट कोर्टात सादर केले होते. त्यामध्ये ड्रग्जबद्दल चर्चा झाली होती. या चॅटच्या आधारे एनसीबीने न्यायालयाकडे आर्यनसह उर्वरित आरोपींच्या रिमांडची मागणी केली आहे. ही अभिनेत्री त्यावेळी कोण होती, यावर कोणताही खुलासा झाला नव्हता. मात्र अशातच आता अनन्या पांडेच्या घरी छापा पडल्यामुळे ती उदयोन्मुख अभिनेत्री अनन्या पांडे हिच आहे का असा प्रश्न पडत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT