Hasan Mushrif : Sarkarnama
देश

Hasan Mushrif : मुश्रीफांच्या कागल येथील घरावर ED चा पुन्हा छापा : दीड महिन्यातील दुसरी कारवाई

Hasan Mushrif vs Kirit Somaiya : पाच गाड्यामधून हे अधिकारी आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Hasan Mushrif vs Kirit Somaiya :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडीने छापेमारी केली आहे.

दीड महिन्यातील ही तिसरी कारवाई आहे. आज सकाळी सात वाजता ईडीचे चार ते पाच अधिकारी आपल्या पथकासह त्यांच्या घरी पोहचले आहेत. पाच गाड्यामधून हे अधिकारी आले आहेत.

ईडीकडून काल (10 मार्च) साखर कारखान्याशी संबंधित कोल्हापूर आणि पुण्यात सर्च ऑपरेशन सुरु केल्याची वृत्त एएनआयने दिलं आहे. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कथित 40 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा बँकेतील काही खात्यांचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुरगूड पोलिस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

फसवणुकीच्या आरोपाखाली कोल्हापूर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अडकवण्यासाठी आणि अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) ससेमिरा पाठी लावण्यासाठी ‘हेतुपुरस्सर’ गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा मुश्रीफ यांनी तो रद्द करण्याची मागणी केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी 24 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना मुंबई उच्च न्यायालाने आदेश काल (शुक्रवारी) दिले आहेत.

मुश्रीफ यांच्या कोणत्याही प्रकरणाचा थेट संबंध नसतानाही सोमय्यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत आणि एफआयआरची काँपी सर्वात आधी कशी मिळते, असा प्रश्न न्यायालयाने आज विचारला.या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी होता. 2020 साली आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना पारदर्शक पद्धतीने व्यवहार न होता ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र, तरी सुद्धा या कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT