Sharad Pawar Sarkarnama
देश

Karnataka Assembly Election : राष्ट्रवादीचा निर्धार, बेळगावात दोन जागा जिंकणार

NCP : कर्नाटक विधानसभा लढविण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय

सरकारनामा ब्युरोे

NCP in Karnatak : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पक्षाचे राज्य सचिव रामभाऊ जाधव (Rambhau Jadhav) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Karnatak Assembly निवडणुकीबाबत माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (ncp) शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सूचनेनुसार कर्नाटकात निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यानुसार बिदर गुलबर्गा बेळगाव व इतर ठिकाणी पक्षाचे उमेदवार उभे करणार आहेत. तत्पूर्वी त्याची चाचपणी केली जात आहे. त्यात बसव कल्याण व औराद विधानसभा मतदारसंघात पक्षाला विजयाची खात्री आहे.

बेळगाव (Belgaon) जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्यात येणार आहे. यासाठी बेळगाव जिल्ह्यात सात अर्ज दाखल झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी चांगला उमेदवार देण्याचा विचार आहे. त्याबाबत पक्षाने तयारी सुरू केल्याचेही जाधव यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे अमोल देसाई, दुर्गेश मेत्री, शाम मांतेरो, मुनीर लतिफ, ज्योतिबा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, महाराष्ट्राबाहेर सध्या राष्ट्रवादीचे लक्षद्विपमधून एक खासदार निवडून आला आहे. त्यांनी दोन्ही मोदी लाटेत आपला गड राखला. तर गुजरात, झारखंड आणि मेघालय येथे प्रत्येकी एक आमदार तर केरळमध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. आता कर्नाटकमध्ये राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे त्यांना कसे यश मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT