Sunetra Pawar Sarkarnama
देश

Sunetra Pawar : खासदार सुनेत्रा पवार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी; 'या' पदावर निवड!

Sunetra Pawar Rajya Sabha Deputy Chairperson : महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी एक्स पोस्टद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे.

Rashmi Mane

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्याच टर्ममध्ये सुनेत्रा पवार यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil tatkare) यांनी एक्सवर पोस्ट करत सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, “राज्यसभेतील चर्चेला योग्य दिशा देणे, संसदीय कामकाजाची शिस्त कायम राखणे आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडणे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘तालिका अध्यक्ष’ पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार श्रीमती सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा!”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) यांनीही सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'राज्यसभेच्या तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व यशस्वी कार्यकाळासाठी अनेक शुभेच्छा!'

सुनेत्रा पवार यांच्यासह आठ खासदारांची तालिका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड तसेच उपाध्यक्ष हरिवंश यांच्या अनुपस्थितीत राज्यसभेच्या कामकाज पाहतील.

या खासदारांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह, तृणमूल काँग्रेसच्या खासदार सुश्मिता देव, भाजप खासदार किरण चौधरी आणि संगीता यादव या चार महिला खासदार तसेच भाजप खासदार घनश्याम तिवारी, डॉ. दिनेश शर्मा, द्रमुकचे पी. विल्सन आणि आम आदमी पक्षाचे विक्रमजितसिंग साहनी या खासदारांची तालिकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT