Ajit Pawar, Supreme Court Sarkarnama
देश

Sharad Pawar Vs Ajit Pawar : वेगळा पक्ष म्हणून ओळख निर्माण करा! सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांना निर्देश

Supreme Court NCP party and Symbol issue : अजित पवार यांच्या पक्षाला दुसरे चिन्ह देण्याची मागणी करणारी याचिका शरद पवारांच्या पक्षाकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.

Rajanand More

New Delhi News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतच्या याचिकेवर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. शरद पवारांचे फोटो आणि व्हिडीओ वापरू नयेत, असे इलेक्टॉनिक परिपत्रक काढून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाचे सर्व उमेदवार व पदाधिकाऱ्यांना सूचना देण्याचे आदेश कोर्टाने यावेळी दिले.

अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांकडून अजूनही शरद पवारांचे फोटो व व्हिडीओचा वापर केला जात असल्याचा मुद्दा वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी उपस्थित केला. त्यावर कोर्टाने हे निर्देश दिले आहेत. तसेच तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा, वेगळा पक्ष म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करा, असा सल्लाही कोर्टाने अजित पवारांना दिला.

मागील आठवड्यात पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद न्यायप्रविष्ट असल्याबाबत अजित पवारांकडून वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्याचे सुप्रीम कोर्टात मान्य करण्यात आले होते. अजित पवारांच्या वतीने बाजू मांडणारे वरिष्ठ वकील बलबीर सिंह यांनी याबाबतची माहिती कोर्टात दिली. तसेच वाहनांवरील माहिती व जाहिरातींमध्येही याबाबत उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवारांच्या बाजूने वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. त्यांनी विधानपरिषदेच्या एका आमदारांचे ट्विट दाखवले. त्यावर कोर्टाने खेडेगावातील लोक ट्विट पाहत असतील का, असे सवाल कोर्टाने केला. सध्याचा भारत वेगळा असल्याचे सांगत सिंघवी यांनी शरद पवारांचा फोटो पोस्ट का केला, यावर जोर दिला.

महाराष्ट्रातील लोकांना यावर वाद सुरू असल्याचे माहिती नाही, असे तुम्हाला वाटते का, असे कोर्टाने विचारताच सिंघवी म्हणाले, शरद पवारांचा फोटो पोस्ट करण्यामागे काही दुवे आहेत. आम्ही एकच आहोत, तुम्ही ज्यावेळी पवारांना मतदान कराल तेव्हा ते संपूर्ण पवार कुटुंबासाठी असेल, आम्ही विभागलो नाही, अजित पवार हे शरद पवारांचे जवळचे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे सिंघवी म्हणाले.

महाराष्ट्रातील 36 मतदारसंघात पवार विरुध्द पवार अशी थेट लढत होत असल्याचा मुद्दाही सिंघवी यांनी उपस्थित केला. त्यानंतर कोर्टाने अजित पवारांच्या वकिलांना सांगितले की, शरद पवार आणि तुमच्या विचारधारेत फरक आहे आणि तुम्ही त्यांच्याविरोधात लढत आहात. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रय़त्न करायला हवा.

तुमचे उमेदवार, पदाधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या पक्षातील प्रत्येकासाठी एक इलेक्टॉनिक परिपत्रक काढून शरद पवारांचो फोटो आणि व्हिडीओ वापरू नका, अशा सुचना देण्याचे निर्देश कोर्टाने दिले. एक वेगळा राजकीय पक्ष म्हणून तुम्ही तुमची स्वतःची ओळख निर्माण करू शकता, असेही कोर्ट म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT