Supriya Sule, Sharad Pawar, PC Chacko Sarkarnama
देश

NCP Sharadchandra Pawar Party : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाबाबत महत्वाची बातमी; पी. सी. चाको यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती

Nationalist Congress Party Shardchandra Pawar Working President PC Chacko : शरद पवार यांनी पी. सी. चाको यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

Rajanand More

PC Chacko appointment : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते पी. सी. चाको यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता सुप्रिया सुळे यांच्यासह चाको हेही कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळतील.

चाको हे केरळ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते माजी खासदार असून पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. फुट पडण्यापुर्वी पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनाला पटेलांबरोबरच सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्याचप्रमाणे पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी राजीव झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षात फुट पडल्यानंतर पटेलांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याच खांद्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जबाबदारी आली होती. त्यानंतर जवळपास वर्षभराने चाको यांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एक्स हॅंडलवर चाको यांच्या नियुक्तीबाबत माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी माजी खासदार पी.सी.चाको यांची नियुक्ती करण्यात आली आल्याचे म्हटले आहे.

पक्ष संघटना आणि पक्षाची ध्येय-धोरणे अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही नेतृत्वांचे सहकार्य निश्चित मिळेल, असा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच सुप्रिया सुळे आणि पी.सी. चाको यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT