Rajya Sabha Winter session 2023 Sarkarnama
देश

Parliament Winter Session : नितीन गडकरींसह सर्व मंत्री, भाजप खासदारांनी 12 मिनिटे उभे राहून केले कामकाज...

Rajanand More

Rajya Sabha News : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी बाकांवरील 141 खासदारांच्या विक्रमी निलंबनाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. त्यात तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्याने भाजपकडून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह सर्व मंत्री आणि एनडीएतील खासदारांनी राज्यसभेत उभे राहून कामकाज करत विरोधकांचा निषेध केला.

खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांनी मंगळवारी संसदेच्या (Parliament) आवारात उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांची मिमिक्री केली होती. हे प्रकरण चांगलेच तापले असून भाजपने (BJP) त्याविरोधात दंड थोपटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही धनखड यांना फोन करून याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. धनखड यांनी राज्यसभेत (Rajya Sabha) बॅनर्जी यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या कृतीविषयी खेद व्यक्त केला आहे.

बुधवारी सकाळी राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी बाकांवरील काही खासदारांकडून घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे दोनवेळा कामकाज तहकुब करण्यात आले. दुपारी बारा वाजता पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी धनखड यांच्या सन्मानासाठी एक तास उभे राहून कामकाजात सहभागी होणार असल्याचे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारमन, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक वरिष्ठ खासदारही उपस्थित होते. या सर्वांनी जवळपास 12 मिनिटे उभे राहून कामकाजात सहभाग घेतला. त्यानंतर धनखड यांनी या कृतीविषयी आदर व्यक्त करून बसण्याची विनंती केली.

तत्पूर्वी, प्रल्हाद जोशी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, विरोधकांकडून मर्यादा ओलांडण्यात आली आहे. ते सातत्याने संविधानिक पदावरील व्यक्तींचा अपमान करत आहेत. त्यांनी 20 वर्ष पंतप्रधानांचा अपमान केला. कारण ते ओबीसी समाजातील आहेत. ओबीसी असलेल्या राष्ट्रपतींचा अपमान केला. उपराष्ट्रपती शेतकरी पुत्र आहेत. या पदाचाही त्यांनी अपमान केला आहे. आम्ही संविधान आणि उपराष्ट्रपतींचा अपमान सहन करणार नसल्याचे जोशी यांनी सांगितले.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT