Sarkarnama NEET Paper Leak | Modi Action | Abhijeet Dipke
देश

Abhijeet Dipke : PM मोदींनी मध्यरात्री शेअर केलेल्या व्हिडिओची अभिजीत दिपकेंनी उडवली खिल्ली; 'ते' मिम शेअर करत डिवचलं

Abhijeet Dipke on PM Modi's Video : NEET पेपरफुटीविरोधात कठोर कायदा आणणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी मध्यरात्री एक व्हिडिओ शेअर करत सांगितलं. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी "उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत पेपरफुटीविरोधात अधिक कठोर कारवाईचे निर्णय घेतले जाणार आहेत." असं लिहिलं आहे.

Jagdish Patil

Jantar Mantar protest : जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाची धग दिवसेंदिवस देशभरात वाढत असल्याने अखेर सरकारने या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. कॉकरोच जनता पार्टी आणि विरोधक केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत.

मात्र, सरकारने आता पेपरफुटीविरोधात कठोर कायदा आणणार असल्याचं सांगितलं. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी मध्यरात्री एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी "उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत पेपरफुटीविरोधात अधिक कठोर कारवाईचे निर्णय घेतले जाणार आहेत." असं लिहिलं आहे.

एकीकडे नीट प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या मसुद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर संसदेच्या दुसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरू होताच हे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं त्यांनी या व्हिडिओत म्हटलं आहे.

तर दुसरीकडे मोदींच्या याच व्हिडिओची कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी खिल्ली उडवली आहे. दीपके यांनी एक्सवर एक मिम शेअर केलं आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती त्याच्या घराबाहेर असलेल्या गेटला कुलूप लावताना दिसत आहे. मात्र, तो ज्या गेटला कुलूप लावतोय. ते छोटं असून त्याच्या बाजूने कोणीही व्यक्ती त्या गेटशिवायही घरात घुसू शकतो, असं मिममधून दाखवण्यात आलं आहे.

मोदींचा व्हिडिओ रिपोस्ट करत, 'कठोर कारवाई' असं कॅप्शन देत दीपके यांनी हा फोटो शेअर केला. त्यामुळे एकप्रकारे सरकारची कठोर कारवाई या व्यक्तीने गेटला कुलूप लावल्याप्रमाणे आहे, असा मेसेज दीपके यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर गुरूवारी आपलं उपोषण मागे घेतलं. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपलं उपोषण सोडण्यांचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती वांगचुक यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर करत दिली.

या व्हिडिओत, "मी 26 दिवसांनंतर माझे उपोषण सोडले. यापूर्वी विविध राजकीय पक्षांतील 65 खासदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन किंवा पत्रांद्वारे मला उपोषण सोडण्याची विनंती केली होती. 'विविध अटींवर दीर्घ चर्चेनंतर आणि देशात हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला," असं वांगचुक यांनी म्हटलं आहे. तर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं तरीही कॉकरोच जनता पार्टी आपल्या आंदोलनावर ठाम असून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका सीजेपीने घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT