PM Modi announces a fast track court proposal and stricter punishment for the NEET paper leak case. Cabinet and Parliament discussions are expected soon. Sarkarnama
देश

PM Modi Video : NEET प्रकरणी PM मोदी अॅक्शन मोडवर; मध्यरात्री शेअर केला व्हिडिओ, नवीन कायदा आणणार...

PM Modi on NEET controversy : 'पेपर लीक हा काही साधा विषय नाही. यामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गेल्या अडीच महिन्यांत घडलेल्या या घटनांनंतर सरकारने अनेक पावले उचलली असून दोषींना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाऊ नये, ही आमच्यावर मोठी जबाबदारी होती.'

Jagdish Patil

PM Modi on NEET controversy : देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणाचा मुद्दा चांगलाच तापला असून, या प्रकरणामुळे केंद्र सरकारची मोठी कोंडी झाली होती. मात्र, आता सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतल्याने सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ शेअर करत NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं.

नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या मसुद्यावर शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच, सोमवारपासून संसदेच्या दुसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरू होत असून, त्यामध्ये हे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे.

मध्यरात्री शेअर केलेल्या व्हिडिओत मोदी नेमके काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "पेपर लीक हा काही साधा विषय नाही. यामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गेल्या अडीच महिन्यांत घडलेल्या या घटनांनंतर सरकारने अनेक पावले उचलली असून दोषींना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाऊ नये, ही आमच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यामुळे कमी वेळात २२ लाख विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच, १९ तारखेला निकालही जाहीर करण्यात आला असून यशस्वी विद्यार्थ्यांच्या बातम्याही आता समोर येत आहेत."

ते पुढे म्हणाले, "मात्र, आम्ही यावर समाधानी बसणारे नाही. त्यामुळेच आज मी संबंधित विभागांना फास्ट ट्रॅक कोर्टासाठी सूचना दिल्या होत्या. विभागांनी तयार केलेला मसुदा रात्री उशिरा माझ्याकडे सादर केला. फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या या मसुद्यावर शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा होईल."

"मंत्रिमंडळातील सदस्यांनी दिलेल्या सूचनांचा विचार करून या मसुद्याला अंतिम स्वरूप दिले जाईल. सोमवारपासून संसदेच्या दुसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरू होईल. त्यामध्ये हे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल," असेही मोदी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले.

दरम्यान, काँग्रेसने यापूर्वी संसदेत "आधी राजीनामा, मग चर्चा" अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे आता सरकार संसदेत हे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न करणार असताना काँग्रेसची भूमिका काय असेल, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेस राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहणार की विधेयकावरील चर्चेत सहभागी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT