PM Modi breaks silence on NEET controversy Sarkarnama
देश

PM Modi on NEET : नीट पेपरफुटी प्रकरणावर PM मोदींनी 'मौन' सोडल; तब्बल 24 दिवसांनंतर दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "हे पाप करणार्‍यांना..."

PM Narendra Modi on NEET Paper Leak : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच आणि आंदोलनाच्या 24 दिवसांनंतर नीट पेपर फुटी प्रकरणावर मोठं भाष्य केलं आहे. आज झालेल्या एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी नीट पेपरफुटीवर भाष्य केलं.

Jagdish Patil

PM Modi comments on NEET exam issue: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे. याच मागणीसाठी काल थेट संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो तरूण आणि विद्यार्थी, पालक सहभागी झाले होते.

तर या आंदोलनादरम्यानच काल तर सीजेपीचे प्रवक्ते आणि भाजप नेते जे.पी. नड्डा यांच्यात चर्चा देखील झाली. मात्र, सरकारने अद्याप शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत काही ठोस आश्वासन दिलं नसल्याने पुन्हा सीजेपीकडून आंदोलन सुरू ठेवण्यात आलं आहे.

तर अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच आणि आंदोलनाच्या 24 दिवसांनंतर नीट पेपर फुटी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. आज झालेल्या एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी नीट पेपरफुटीवर भाष्य केलं.

या बैठकीत बोलताना पंतप्रधान म्हणाले, "पेपरफुटी प्रकरणी कारवाई करताना आतापर्यंत 13 जणांना तुरुंगात टाकलं आहे. विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेतली. पेपर फोडण्याचे पाप करणार्‍यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासाठी टॉप वकिलांनी सहकार्य करावं", असं मोदी या बैठकीत म्हणाल्याची माहिती समोर आली आहे.

शिवाय भविष्यात पेपरफुटीसारख्या घटना घडू नयेत हे सुनिश्चित करण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचंही ते या बैठकीत म्हणाले. तर पंतप्रधानांनी अशा वेळी हे वक्तव्य केलं आहे. जेव्हा देशभरातील विद्यार्थी आणि पालक 'नीट' पेपरफुटीवरून संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता कालच्या आंदोलनानंतर सरकार नीट पेपरफुटी प्रकरणी गंभीर झाल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT