Narendra Modi : Amit shah : Sengol News Sarkarnama
देश

Sengol in New Parliament: नव्या संसद भवनात लावण्यात येणारं 'सेंगाल' काय आहे? नेहरूंची परंपरा मोदी चालवणार?

Historic Sceptre Sengol to be Placed in New Parliament: नरेंद्र मोदी चालवणार नेहरूंची पंरपरा..

सरकारनामा ब्यूरो

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी नवीन संसद भवन देशाला समर्पित होणार आहे. यादरम्यान पंतप्रधान सभागृहात सभापतींच्या आसनाजवळ सेंगोल लावतील. हा ऐतिहासिक क्षण असेल. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री एका अनोख्या प्रक्रियेअंतर्गत ब्रिटीशांकडून सत्ता हस्तांतरण म्हणून सेंगोल स्वीकारले. हेच आता नव्या संसद भवनात बसवले जाणार आहे.

सेंगोल या शब्दाचा अर्थ जनभावना आणि धोरणाचे पालन करण्याशी संबंधित आहे. भारतातील चोल साम्राज्याच्या आठव्या शतकापासून चालत आलेली ही एक प्रथा आहे.

सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या गदाच्या आकाराला तमिळमध्ये सेंगोल म्हणतात. त्याचा अर्थ संपत्ती आणि समृद्धीशी जोडलेला आहे. सेंगोलने आपल्या भारतीय इतिहासात मोठी भूमिका बजावली आहे. ब्रिटिशांकडून भारतात सत्ता हस्तांतरित करण्याचे सेंगोल हे माध्यम बनले. पंडित नेहरूंनी तामिळनाडूतून सेंगोल स्वीकारले होते.

पत्रकार परिषदेत ही माहिती देताना गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, देशाच्या इतिहासात अशी घटना घडली आहे, ज्याची बहुतांश लोकांना माहिती नाही. आता सेंगोल 1947 सालच्या भावनांची पुन्हा एकदा रूजवणूक करेल.

लॉर्ड माउंटबॅटन यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना भारतीय परंपरांबाबत विचारले. यानंतर त्यांनी सहकाऱ्यांशी चर्चा केली. सी राजगोपालाचारी यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास करून सेंगोलची प्रक्रिया अधोरेखित केली होती. त्यानंतर भारताच्या राजवटीच्या आध्यात्मिक परंपरेनुसार सेंगोलच्या माध्यमातून सत्ता हस्तांतरित करण्यात आली होती. याचे प्रतीक म्हणून सेंगाल ओळखले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT