Zohran Mamdani Letter to Umar Khalid : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांनी जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता तथा 2020 मधील दिल्ली दंगल प्रकरणी बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) कायदा अंतर्गत (UAPA) तिहार तुरुंगात असलेल्या उमर खालिद याला एक पत्र लिहिल्याचं समोर आलं आहे.
हे पत्र ममदानी यांनी स्वत:च्या हाताने लिहिलेल्याचा दावा केला जात आहे. महत्वाची बाब म्हणजे ममदानी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी (ता.01) न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाची शपथ घेतल्यानंतर हे पत्र समोर आले आहे. या पत्रात 'आम्ही सर्व तुझ्याबद्दल विचार करत आहोत.' असं ममदानी यांनी लिहिलं आहे.
डिसेंबर 2025 मध्ये खालिदचे वडील कासीम इलियास यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय व्यक्तींची भेट घेतली होती. यावेळीच ममदानी यांनी खालिद याच्या कुटुंबियांकडे हे पत्र सोपवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आता या पत्रामुळे भारतात नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली आहे.
ममदानी यांनी या पत्रात लिहिलंय की, 'प्रिय उमर, मला कटुता स्वतःवर हावी होऊ देऊ नये, हे तुझे शब्द नेहमी आठवतात. तुझ्या आई-वडिलांना भेटून आनंद झाला. आम्ही सर्वजण तुझ्याबद्दल विचार करत आहोत.' दरम्यान, डिसेंबर 2025 मध्ये उमरला बहिणीच्या लग्नासाठी 14 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.
खालिदवर कट रचणे, दंगल, बेकायदेशीर जमाव तसेच UAPA असे गंभीर आरोप दाखल आहेत. तर याआधीही ममदानी यांनी खालिदला पाठिंबा दिला आहे. 2023 मध्ये न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात ममदानी यांनी उमर खालिदने तुरुंगातून लिहिलेले पत्र वाचून दाखवले होते. तर यावेळी त्यांनी उमरचे वर्णन 'द्वेष आणि लिंचिंगविरोधात आवाज उठवणारा' असे केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.