Rakesh tikait Sarkarnama
देश

टिकैत बंधूना धक्का; शेतकरी आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केलेल्या संघटनेत ६ महिन्यातच फूट

Rakesh tikait | Bharatiya Kisan Union | संस्थापक महेंद्रसिंह टिकैत यांच्या पुण्यतिथी दिवशीच संघटनेत फूट

सरकारनामा ब्युरो

(Rakesh tikait latest news)

लखनौ : कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाचे यशस्वीपणे नेतृत्व करणाऱ्या भारतीय किसान युनियन या ३३ वर्ष जुन्या संघटनेमध्ये उभी फूट पडली आहे. शेतकरी आंदोलनाचा देशव्यापी चेहरा बनलेले राकेश टिकैत (Rakesh tikait) आणि त्यांचे बंधू नरेश टिकैत यांच्यापासून स्वतंत्र होत संघटनेचे निलंबीत उपाध्यक्ष राजेशसिंह चौहान यांच्या नेतृत्वात भारतीय किसान युनियन (अराजकीय) ही संघटना अस्तित्वात आली आहे. यानंतर १८ मे रोजी भारतीय किसान युनियनच्या कार्यकारणिची बैठक बोलवण्यात आली आहे. (Bharatiya Kisan Union latest news)

संघटनेचा वापर राजकीय कारणांसाठी आणि स्वत:च्या फायद्यासाठी केल्याचा आणि राजकीय पक्षांच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोप टिकैत बंधूंवर करण्यात आला आहे. दिवंगत शेतकरी नेते आणि भारतीय किसान युनियनचे संस्थापक महेंद्रसिंह टिकैत यांच्या पुण्यतिथी दिवशीच संघटनेत फूट पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लखनौमध्ये राजेशसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी भारतीय किसान युनियनतर्फे राकेश टिकैत यांनीच नेतृत्व केले होते. या आंदोलनानंतर सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले होते. मात्र, त्यानंतर टिकैत बंधूंनी संघटनेमध्ये राजकारण घुसविले आणि शेतकऱ्यांचे हित हे उद्दीष्ट बाजूला पडले, असा आरोप राजेशसिंह चौहान यांनी केला.

दरम्यान या बद्दल बोलताना राजेशसिंह चौहान म्हणाले, आम्हाला राकेश टिकैत किंवा नरेश टिकैत यांच्याबद्दल काहीही बोलायचे नाही. त्यांना जे करायचे ते त्यांनी करावे. मात्र, भारतीय किसान युनियनचे रुपांतर राजकीय पक्षात झाले होते. आम्ही आमची चिंता राकेश टिकैत यांच्याकडे व्यक्त केली, पण त्यांनी एकाच पक्षाला पाठिंबा देण्याचा आग्रह धरला. आमचा याला विरोध होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT