Dawood Ibrahim
Dawood Ibrahim Sarkarnama
देश

'एनआयए'ची मोठी कारवाई; डी-कंपनीच्या मुसक्या आवळल्या; मुंबईत 24 ठिकाणी छापेमारी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) सोमवारी दिवसभर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) निकटवर्तीयांवर छापेमारी करून खबळबळ उडवून दिली आहे. एकाच दिवशी मुंबईतील तब्बल 24 ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याचे समजते. या छापेमारीमध्ये शस्त्रास्त्रं, मोठी रक्कम, व्यवहारांची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. एनआयएच्या हाती अनेक महत्वाचे धागेदोरे लागल्याचे समजते. (Dawood Ibrahim latest Marathi News)

एनआयएकडून सकाळी सात वाजल्यापासूनच छापेमारी सुरू करण्यात आली. डी-कंपनीविरोधातील गुन्ह्यांच्या अनुषंगाने हे छापे टाकण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई आणि मीरारोड- भाईंदरमधील पाच ठिकाणांचा समावेश आहे. एनआयएकडून तीन फेब्रुवारी रोजी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला जात आहे. डी गॅंगच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कच्या माध्यमातून दहशतवादी आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांचा तपास एनआयएने हाती घेतला आहे. (NIA raids on Dawood Ibrahim's associates)

दाऊद इब्राहिमसह हाजी अनिस, छोटा शकील, जावेद चिकना आणि त्यांच्या साथिदारांचा समावेश असलेल्या डी कंपनीशी संबंधितांवर ही छापेमारी करण्यात आल्याचा दावा एनआयएने केला आहे. एनआय़एने माहिम दर्गा आणि हाजी अली दर्ग्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त सोहन खंडानीवाला यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे तब्बल 13 तास चौकशी करण्यात आल्याचे समजते. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुट यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. समीर अंगोरा, अब्दुल कय्युम, मोबिदा भिवंडीवाला गुड्डु पठाण यांनाही एनआयएने ताब्यात घेऊन चौकशी केल्याचे समजते. समीर हिंगोरा याने 1993 च्या मुंबई स्फोटा दरम्यान अभिनेता संजय दत्तच्या घरी शस्त्र दिल्याचा आरोप होता. अबू सालेमही त्याच्यासोबत होता. समीर हिंगोरा हा चित्रपट निर्माता असून त्याला टाडा अंतर्गत अटक ही करण्यात आली होती. तो नऊ वर्षाची शिक्षा भोगून बाहेर आला आहे.

मोठ्या प्रमाणात पैसे रियल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आल्याचे तपासात समोर आलं आहे. रियल इस्टेट तसेच अन्य माध्यमातून जमा झालेले पैसे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना लष्कर ए तयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांना पुरवल्या जात असल्याचा मोठा दावा एनआयएने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT