BJP MP Nishikant Dubey news : झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन चांगलेच पेटले असून त्याचे पडसाद आता दिल्लीतही उमटू लागले आहे. झारखंड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष एल. खियांग्ते यांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर सीआयडीने ही कारवाई केली आहे. त्यानंतर आता भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी गंभीर आरोप केला आहे.
निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत लोकसभा निवडणुकीत आपल्या पराभवासाठी षडयंत्र रचण्यात आले होते, असा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे. २०१९ मध्ये माझा लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी खूप प्रयत्न झाले. मी केवळ फोन केला म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी ते (खियांग्ते) निवडणूक अधिकारी होते.
खियाग्ते यांनी ज्या पक्षाला विजयी करण्यासाठी माझ्याविरोधात षडयंत्र रचले, आज त्याच सरकारने त्यांना जेलमध्ये पाठविले. विद्यार्थ्यांना विजयाच्या शुभेच्छा, अशी पोस्ट करत दुबे यांनी खियांग्ते यांच्या अटकेवर एकप्रकारे आनंद साजरा केला आहे. सीआयडीकडून १४ व्या राज्यसेवा प्राथमिक परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी केली जात आहे. खियांग्ते यांचीही चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना सोमवारी अटक करण्यात आली.
खियाग्ते यांच्यासह आयोगाच्या संचालकांनी मागील आठवड्यातच पदाचा राजीनामा दिला होता. खियाग्ते यांनी झारखंडचे मुख्य सचिव म्हणूनही काम केले आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर राज्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली होती. पण आता त्यांच्या अटकेमुळे प्रशासनही हादरले आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी या अटकेचे स्वागत करतच खियांग्ते आणि सरकारमधील कनेक्शनवर बोट ठेवले आहे.
दरम्यान, परीक्षा घेणाऱ्या कंपनीली कंत्राट देण्याच बदल्यात दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा खियाग्ते यांच्यावर आरोप आहे. एवढेच नाही तर या कामातून मिळणाऱ्या फायद्यात २० टक्के कमिशन घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संबंधित सर्व परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.