Nitin Gadkari News : मंत्र्यानेच अधिकाऱ्याला मारहाण करत त्याचे डोके फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हिमाचल प्रदेशमधील पंचायत राज मंत्री अनिरुद्ध सिंह यांच्यावर अधिकाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा देखील झाला आहे. अनिरुद्ध यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दोन अधिकाऱ्यांना धमकावत मारहाण केली. मारहाणीचे कारण होते शिमलामधील चमयान येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे पडलेली इमारत.
अधिकाऱ्यांना मारहण केल्याची माहिती मिळताच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध केला. याविषयी त्यांनी ट्विटवरून आपली नाराजी बोलून दाखवली आहे. दरम्यान, अनिरुद्ध सिंह राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अनिरुद्ध सिंह हे काँग्रसचे मंत्री आहेत. त्यांना रस्त्याच्या कामामुळे इमारत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांना बैठकीचे कारण देत बोलवले.मात्र,बैठक न घेता त्यांनी झालेल्या घटनेवर राग व्यक्त करत त्यांना मारहाण केली. रागाच्या भरात अनिरुद्ध यांनी मातीचे भांडे अधिकाऱ्याच्या डोक्यात घालून त्याला जखमी केले. दुसर्या एका अधिकाऱ्याने मध्यस्थी करत अनिरुद्ध यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असताना त्याला देखील मारहाण करण्यात आली.
नितीन गडकरी यांनी ट्विट करत म्हटले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे शिमला येथील व्यवस्थापक अजल जिंदल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पंचायत राज मंत्री यांनी केलेला हल्ला निंदनीय आहे. आपल्या अधिकृत कर्तव्यांचे पालन करत असलेल्या अधिकाऱ्यावर असा हल्ला केवळ वैयक्तिक सुरक्षेलाच धक्का देत नाही, तर संस्थात्मक प्रामाणिकतेलाही बाधा पोहोचवतो. या गंभीर घटनेची मी गांभीर्याने दखल घेतली आहे आणि मी हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याशी बोललो असून सर्व दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
मंत्री अनिरुद्ध सिंह राणा यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीत अचल जिंदल यांनी म्हटले आहे की, मंत्र्यांनी चाम्याणा परिसरात कोसळलेल्या इमारतीविषयी विचारले असता आम्ही त्यांना सांगितले की इमारत पडण्यापूर्वीच आम्ही लोकांना त्यातून बाहेर काढले होते. ती इमारत एनएचएआयच्या अखत्यारित येत नसल्याची कल्पना देखील मंत्र्यांना दिली तसेच या प्रकरणी नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे सांगितले मात्र आपले बोलणे ऐकल्यानंतर मंत्री अनिरुद्ध सिंह नाराज झाले आणि त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच पाण्याचा माठ मारून एका अधिकाऱ्याला गंभीर जखमी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.