Nitin Gadkari: खराब रस्त्याबाबत देशभरात कमी अधिक प्रमाणात सारखीच परिस्थिती बघायला मिळते. यामुळेच अनेकदा देशाच्या विविध भागात झालेल्या मोठ्या अपघातास खराब रस्तेच कारणीभूत ठरले आहेत.
दरम्यान, याच मुद्द्यावरून रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खराब रस्त्याबद्दल माफी मागितली आहे. ते मध्य प्रदेश दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भरसभेत माफी मागितली आहे. (Union Minister Nitin Gadkari, MP Latest News)
गडकरी हे मध्य प्रदेश दौऱ्यावर होते.जबलपूर येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तेरा प्रकल्पांचे भुमिपूजन मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले.
यावेळी गडकरी आपल्या भाषणात म्हणाले, 400 कोटी रुपये खर्चून बारेला ते मांडला या दरम्यान बांधण्यात येत असलेल्या 63 किमीचा टू-लेन रोडवरील कामांबाबत मी समाधानी नाही. प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्याचेही त्यांनी यावेळी अधिकार्यांना सांगितले.
जुने काम दुरुस्त करुन आणि नवीन निविदा मागवत हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. आतापर्यंत तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल माफ करा, अशा शब्दात गडकरी (Nitin Gadkari) यांनी जनतेची माफी मागितली आहे.
दरम्यान, मांडला येथील रस्त्यांच्या भूमीपूजन कार्यक्रमाला गडकरी आले असता त्यांनी जबलपूर-मांडला या ४०० कोटींच्या रस्त्याचं खराब काम झाल्याची तक्रार लोकांनी केली. त्यानंतर त्यांनी आपण या रस्त्याच्या कामावर खूश नाही म्हटले. शिवाय ४०० कोटींचा खर्च करून ६३ किलोमीटर लांबीचा दोन लेनचा रस्ता बनवणे सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
केंद्रीय मंत्री असूनही लोकांनी सस्त्याच्या कामाबद्दल तक्रार करताच त्याबद्दल गडकरी यांनी जाहीर सभेत माफी मागत त्या कामाला स्थगिती दिल्याने अनेकांकडून गडकरी यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.