Nitish Kumar Gift Mango to PM Modi Sarkarnama
देश

Nitish Kumar Gift Mango to PM Modi: 'पंचवटी'मध्ये आमरसाचा बेत; नितीशकुमारांनी पाठवलेले जर्दाळू आंबे मोदी चाखणार...

Narendra Modi to Taste Mangoes Presented by Bihar CM Nitish Kumar : विक्रमशीला एक्स्प्रेसमधून दोन हजार आंबे पाठविण्यात दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आनंदविहार टर्मिनलमधून आंबे आज बिहार भवनमध्ये उतरविण्यात येणार आहेत.

Mangesh Mahale

Bihar CM Nitish Kumar Meets PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'एनडीए' सरकार स्थापन होत असताना नितीशकुमार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशातच नरेंद्र मोदी यांचे दिल्लीतील सरकारी निवासस्थान असलेले ७, लोककल्याण मार्गावरील 'पंचवटी'मध्ये आमरसाचा बेत आखण्याला आला आहे. बिहारच्या संस्कृतीचे प्रतीक असलेले जर्दाळू आंबे नितीशकुमारांकडून 'पंचवटी'मध्ये पोहचले आहेत.

सत्तास्थापनेच्या याकाळात नितीशकुमारांनी मोदींना दिलेल्या या भेटीकडे 'खास भेट'म्हणून पाहिले जात आहे. विजयाचा आनंद साजरा करण्याचा आणि सलोख्याचं नातं जपण्यासाठी नितीशकुमारांकडून हा प्रयत्न केला जात आहे.

मोदी या आंब्यांची चव चाखणार का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. जर्दाळू आंबे हे बिहारच्या संस्कृतीचे प्रतीक. हे आंबे चव आणि गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहेत. खास प्रसंगी ते भेट देण्याची परंपरा बिहारमध्ये आहे. भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंजमधील शेतकरी अशोक चौधरी हे 'मँगो मॅन' नावाने प्रसिद्ध आहेत.

कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या आमराईतून आंब्यांची पाहणी करून पेट्या तयार केल्या आहेत. विक्रमशीला एक्स्प्रेसमधून दोन हजार आंबे पाठविण्यात दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आनंदविहार टर्मिनलमधून आंबे आज बिहार भवनमध्ये उतरविण्यात येणार आहेत. त्यानंतर मोदींच्या 'पंचवटी'सह दिल्लीतील बड्या नेत्यांकडे आंब्याच्या पेट्या रवाना होणार आहेत.

नितीशकुमार यांच्याकडून भागलपूरमधून दरवर्षी राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक सेलिब्रेटींना जर्दाळू आंबे भेट दिले जातात. पंतप्रधान आणि राष्ट्रपती २००७ पासून जर्दाळू आंब्यांचा आस्वाद घेत आहेत. पण यंदा लोकसभेच्या निकालनंतर, भाजपने बहुमताचा आकडा गाठला नसताना नितीशकुमार यांनी मोदींच्या या खास भेटीकडे सगळ्याचे लक्ष वेधले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नुकतीच मोदींची भेट घेतली. ही भेट महत्वाची मानली जाते. लोकसभेच्या निकालाबाबत दोन्ही नेत्यामध्ये चर्चा झाल्याचे समजते. सरकार स्थापनेत जेडीयूची काय भूमिका असेल, हे लवकरच समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT