Uddhav Thackeray, NitishKumar
Uddhav Thackeray, NitishKumar sarkarnama
देश

नितीशकुमारांनी आपल्या पक्षातील 'एकनाथ शिंदे' ओळखला आणि भाजपलाच डच्चू दिला...

अमोल जायभाये

Bihar Politics : मुंबई : देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री यांनी भाजपचा हात सोडत आरजेडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाजपने (BJP) आणखी एक मोठा मित्रपक्ष गमावला आहे. भाजपने महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सरकार पाडले. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत सरकार स्थापन केले. त्याची पुनरावृत्ती बिहारमध्येही होईल अशी भिती नितीशकुमार (NitishKumar) यांना होती. त्यामुळेच त्यांनी भाजपचा हात सोडला अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बिहारमध्ये सत्तेत असलेला जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला होता. केंद्रीय मंत्री अमित शहा हे सतत जेडीयूमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत, असे नितीश कुमार यांचे म्हणने होते. पक्षाचे माजी नेते आरसीपी सिंह हे अमित शहा यांचे प्यादे म्हणून काम करत असल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला होता.

जेडीयूच्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आरसीपी शिंह यांनी गेल्या आठवड्यात पक्षाचा राजीनामा दिला होता. 2017 मध्ये, आरपीसी सिंह हे नितीशकुमार यांचे प्रतिनिधी म्हणून जेडीयू कोट्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले होते. मात्र, त्यानंतर नितीशकुमार यांनी सिंह यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यास विरोध केला. त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. सिंह यांच्या माध्यमातून भाजप पक्ष फोडू शकते असा संशय नितीशकुमार यांना होता. त्यामुळेच महाराष्ट्रात जी अवस्था शिवसेनेची झाली ती आपली होऊ नये या भावनेतूनच त्यांनी भाजपचा हात सोडल्याचे सांगितले जात आहे.

2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या जेडीयूने 243 जागांपैकी 45 जागा जिंकल्या. तर भाजपला 77 जागा मिळाल्या होत्या. जेडीयूने कमी जागा जिंकूनही भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्री बनवून त्यांच्याकडे राज्याची कमान सोपवली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत 2020 मध्ये राष्ट्रीय जनता दलाने 79 जागा आणि काँग्रेसने 19 जागा जिंकल्या होत्या.

आता जेडीयू, आरजेडी, काँग्रेस एकत्र येत सरकार स्थापन करणार आहे. भाजपला महाराष्ट्र मिळाले असले तरी बिहार हातातून गेले आहे. भाजप पक्ष फोडू शकतो अशी खात्री नितीशकुमार यांची होती. त्यामुळे भाजपने आपला डाव टाकण्याआधीच आरसीपी सिंह यांची पक्षातून हाकालपट्टी करत नितीशकुमार यांनी भाजपलाच झटका दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT