Nitish Kumar Net Worth  Sarkarnama
देश

Nitish Kumar Net Worth : नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री, तरीही...; संपत्ती पाहून तुम्हाला बसेल धक्का; किती जमीन, दागिने?

Nitish Kumar Net Worth 10th Time as CM : नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेट वर्थमध्ये किती जमीन, दागिने आणि मालमत्ता आहे? धक्कादायक संपत्ती तपशील जाणून घ्या.

Rashmi Mane

बिहारमध्ये नुकताच निवडणूक पार पडली असून नितीश कुमार यांनी आता 10 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पण अनेक वर्षे मुख्यमंत्री असूनही त्यांच्या नावावर बिहारमध्ये स्वतःचे घर नाही, ही बाब नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्यांच्या एकूण संपत्तीवर नजर टाकल्यास ती 1कोटी 64 लाख 82 हजार 719 रुपये असल्याची माहिती त्यांच्या शपथपत्रात दिली आहे.

नितीश यांच्या संपत्तीकडे पाहिले तर 16,82,719 रुपये जंगम मालमत्ता आणि 1,48,00,000 रुपये स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या जवळ 22 हजार रुपये रोख आणि सुमारे 49 हजार रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा आहेत. 2015 मध्ये त्यांच्या नावावर साधारण 2.73 कोटी रुपयांची संपत्ती होती. त्यातील मोठा हिस्सा त्यांच्या मुलाच्या नावावर होता. त्या तुलनेत 2024 मध्ये नीतीश यांच्या चल संपत्तीत घट झाल्याचे दिसते.

सध्या त्यांच्या जवळ 11 लाख 32 हजार रुपये किंमतीची फोर्ड इकोस्पोर्ट्स कार आहे. तसेच त्यांच्या जवळ 20 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या आणि एक चांदीची अंगठी असून त्यांची एकूण किंमत 1,26,000 रुपये आहे. घरातील वस्तूंमध्ये एसी, कंप्यूटर, ट्रेडमिल, वॉशिंग मशीन, व्यायाम सायकिल, गोदरेज मायक्रोवेव्ह, ओटीजी यांसह 12 गायी आणि 9 बछडेही आहेत. या सर्व वस्तूंची एकूण किंमत 3,52,125 रुपये नोंदवली आहे.

नितीश कुमार यांच्या नावावर दिल्लीच्या द्वारका येथे हजार स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे, ज्याची किंमत 1.48 कोटी रुपये आहे. 2004 च्या शपथपत्रात पाहिले तर त्यावेळी त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावावरच जास्त संपत्ती होती.

त्या वेळी त्यांच्या पत्नीच्या मालकीची पटना येथे 2524 स्क्वेअर फूटची मालमत्ता होती, तर मुलाच्या नावावर सुमारे सात लाखांची शेतीयोग्य जमीन होती. दिल्लीतील त्यांचा फ्लॅट त्यावेळी 11 लाख रुपयांचा होता, जो आज वाढून एक कोटींपेक्षा अधिक झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT