New Delhi : इंडिया आघाडीशी काडीमोड घेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार एनडीएमध्ये सामील झाले आहेत. आघाडीतील अनेक मुद्यांवरून ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नितीशकुमारांनी भाजपसोबत जाण्याआधी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची माफी मागितली आहे. (Nitish Kumar News)
इंडिया आघाडीची (India Alliance) दिल्लीत डिसेंबर महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत नितीशकुमारांनी हिंदीतून भाषण केले होते. डीएमकेचे खासदार टीआर बालू यांना हिंदी समजणे कठीण गेले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या शेजारी बसलेले राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांना भाषणाचा इंग्रजीत अनुवाद करण्याची विनंती केली होती.
मनोज झा यांनी नितीशकुमारांना याबाबत सांगितल्यानंतर ते चांगलेच संतापले होते. या देशाला आपण हिंदुस्तान म्हणतो. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. आपल्या सर्वांनी ही भाषा यायला हवी, असे खडबोल नितीश यांनी सुनावले होते. तसेच भाषणाचा अनुवाद इंग्रजीतून कऱण्यास परवानगीही दिली नव्हती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नितीश यांच्या या भूमिकेवर डीएमके (DMK) सदस्यांनी बैठकीतच नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार यांना आघाडीचे संयोजक बनविण्याबाबत तृणमूल काँग्रेस, डीएमकेसह शिवसेनेनेही विरोध केला होता. यावेळी काँग्रेसने (Congress) मध्यस्थाची भूमिका घेतली होती. स्टॅलिन आणि उध्दव ठाकरेंना नितीश यांच्याशी चर्चा कऱण्यास तयार केले होते.
चार जानेवारी रोजी झालेल्या चर्चेदरम्यान नितीश यांनी आपल्यी हिंदी भाषेच्या विधानावरून मवाळ झाले होते. त्यांनी स्टॅलिन (MK Stalin) यांची याबाबत माफी मागितली होती. स्टॅलिन यांनीही त्याचा स्वीकार करत पुढे जाण्यास समर्थन दिले होते, असे काँग्रेसमधील सुत्रांनी सांगितले. दरम्यान, नितीश कुमार एनडीएमध्ये परत गेल्यानंतर इंडिया आघाडीतील बहुतेक पक्षांनी त्याबाबत आनंदच व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.