Nitish Kumar
Nitish Kumar Sarkarnama
देश

Bihar Riot : बिहारमधील हिंसाचारानंतर नितीश कुमार अॅक्शन मोडवर; दिला 'हा' इशारा

सरकारनामा ब्युरो

Patana News : नालंदा आणि सासाराममध्ये रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत जातीय हिंसाचार उसळला होता. दोन्ही ठिकाणी जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यासोबतच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. दरम्यान, ही दंगल म्हणजे कुणाच्यातरी षडयंत्रांचा भाग असल्याचा आरोप मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी केला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) म्हणाले की, "रामनवमीच्या मुहूर्तावर नालंदा जिल्हा मुख्यालय असलेल्या सासाराम आणि बिहारशरीफमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचार हे कुणाचे तरी 'षडयंत्र' आहे. अशा घटना अत्यंत खेदजनक आहेत. असे प्रकार कधीच होत नाहीत. ही घटना नैसर्गिक नाही, कोणीतरी चूक केली असावी. अशा परिस्थितीत आम्ही सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल."

मुख्यमंत्री म्हणाले, "अशा घटनांमुळे त्रास होतो. पूर्वी असे कधीच घडत नव्हते. प्रत्येक सण आपण अतिशय शांततेने साजरा करायचो. पण आता अशा घटना का घडत आहेत, हे कळत नाही. हे नैसर्गिक नाही. सर्वसाधारणपणे अशा घटना घडतात. येथे घडले नाही. या घटनेमागील कारण स्पष्ट होण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी करण्यास सांगितले आहे."

दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासाठी भाजपने सासाराममधील आयोजित कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. त्याबाबत विचारले असता, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यासंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.

ते म्हणाले, "आता भाजपने स्वत:चा कोणताही कार्यक्रम केला तर मी काय करू. अमित शहा का येत होते आणि ते का येत नव्हते, याचा अर्थ आम्हाला काय माहिती? आता कोणतेही सरकारी कामकाज नव्हते. पण केंद्र सरकार ते राज्य सरकार मंत्री आल्यावर जे काही करायचे ते केले जाते, त्यांचे आरोप चुकीचे आहेत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT