CM Nitish Kumar's Son Nishant Kumar Net worth sarkarnama
देश

Nishant Kumar net worth : बाप से बेटा सवाई! मुख्यमंत्री नितीश कुमारांपेक्षा मुलगा निशांत कितीतरी पटीने श्रीमंत; समोर आली धक्कादायक आकडेवारी!

Nishant Kumar wealth vs Nitish Kumar assets : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापेक्षा त्यांचा मुलगा निशांत कुमार अधिक श्रीमंत असल्याची माहिती समोर आली असून, संपत्तीच्या आकडेवारीमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

Rashmi Mane

आज बिहारमध्ये 'सम्राट' युगाला सुरुवात झाली आहे. पाटणा येथील लोक भवनात सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारमध्ये भाजपने आपला स्वतःचा मुख्यमंत्री निवडण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण बिहारच्या राजकारणात मोठा बदल घडवणाऱ्या नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या कुटुंबाकडेही सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

नितिश कुमारांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला, पण त्याचबरोबर त्यांच्या मुलाबद्दलही चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांचा मुलगा निशांत कुमार आर्थिकदृष्ट्या वडिलांपेक्षा अधिक सक्षम असल्याचे समोर आले आहे.

माहितीनुसार, निशांत कुमार यांची एकूण संपत्ती सुमारे 3.61 कोटी रुपये आहे, जी नितीश कुमार यांच्या संपत्तीपेक्षा 4 ते 5 पट जास्त असल्याचे सांगितले जाते. निशांत कुमार यांच्या संपत्तीची किंमत सुमारे 1.63 कोटी रुपये आहे. यात बँक खात्यांमधील रक्कम, रोख पैसे आणि विविध गुंतवणुकींचा समावेश आहे. यावरून त्यांची आर्थिक नियोजनशक्ती आणि गुंतवणूक करण्याची पद्धत मजबूत असल्याचे दिसून येते.

त्याचबरोबर, जमीन आणि घर यांसारख्या मालमत्तेसह त्यांच्या अचल संपत्तीची किंमत जवळपास 1.98 कोटी रुपये आहे. रिअल इस्टेटमध्ये केलेली ही गुंतवणूक त्यांच्या एकूण संपत्तीत महत्त्वाची भर घालते. निशांत कुमार यांच्या बँक खात्यांमध्ये आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये मिळून 1.28 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा असल्याचे सांगितले जाते.

याशिवाय, नालंदा जिल्ह्यातील कल्याण बिगहा या गावात त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. या गावात त्यांच घर आणि शेत जमीन असून ती त्यांच्या कुटुंबाच्या मुळांशी जोडलेली आहे. निशांत कुमार यांच्या संपत्तीतील मोठा हिस्सा हा त्यांना वारशातून मिळालेला आहे. त्यांच्या आई मंजू सिन्हा यांच्या निधनानंतर ही मालमत्ता त्यांच्याकडे आली, ज्यामुळे त्यांच्या एकूण संपत्तीत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे आजच्या घडीला ते आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्थिर व्यक्ती म्हणून समोर येत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT