NitishKumar
NitishKumar sarkarnama
देश

नितीशकुमार अॅक्शन मोडवर; भाजपला रोखण्यासाठी रणनिती ठरवणार

सरकारनामा ब्यूरो

NitishKumar : पाटणा : बिहारमध्ये भाजपची साथ सोडत महाआघाडीशी घरोबा करून सत्तास्थापन करणारे संयुक्त जनता दलाचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (NitishKumar) यांनी आता भाजपशी (BJP) टक्कर घेण्यासाठी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याचा निर्धार केला आहे. मणिपूरमध्ये 'जेडीयू'चे पाच आमदार फोडणाऱ्या भाजपवर नितीश यांनी आज उघड निशाणा साधला.

भाजपला हटविण्यासाठी एकत्र या, असे आवाहन नितीशकुमार यांनी विरोधकांना केले. नितीशकुमार हे ५ सप्टेंबर रोजी दिल्लीला जाणार असून ते काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचीही भेट घेणार आहेत. संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस आजपासून सुरूवात झाली. या वेळी बोलताना नितीशकुमार यांनी केंद्रावर सडकून टीका केली.

आमदारांची फोडाफाडी हे काही घटनात्मक काम नाही, देशामध्ये नवे राजकारण सुरु झाले आहे. दुसऱ्या पक्षाच्या लोकांना फोडणे चुकीचे आहे. यामुळे २०२४ मध्ये सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांना चांगलाच धडा शिकवतील, अशी गर्जना त्यांनी केली आहे. नितीशकुमार म्हणाले, मणिपूरमधील आमदार हे आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होणार होते. मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याच्या निर्णयाचे देखील त्यांनी समर्थन केले होते.

आम्ही जेव्हा 'एनडीए'मध्ये होतो तेव्हा त्यांनी आमच्या आमदारांना काही दिले नाही. मात्र, आता त्यांनी या आमदारांना पळविले. हे योग्य आहे का? हे घटनात्मक आहे का? हे नियमाला धरून आहे? असे सवाल त्यांनी केले. भाजप अशाच प्रकारचे राजकारण देशभर करते आहे. त्यामुळे सगळ्या विरोधी पक्षांनी २०२४ साठी एकत्र येत भाजपला धडा शिकवावा, असा हल्लाबोल त्यांनी केला. मणिपूरमधील 'जेडीयू'च्या पाच आमदारांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यंदा मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथे सहा जागांवर 'जेडीयू'चे उमेदवार विजयी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT