Jharkhand Assembly Election 2024 : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने झारखंड विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. ही निवडणूक जदयू स्वबळावर लढवणार नसून एनडीएचा घटक पक्ष म्हणून लढवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
जदयू(JDU )चे वरिष्ठ नेते आणि ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार यांनी बुधवारी मीडियाला माहिती देताना सांगितले की, आमच्या आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून या विषयावरील पुढील रणनिती ठरवली जाईल. तसेच त्यांनी दावा केला की, झारखंडमध्ये पूर्ण बहुमताने एनडीएचे सरकार बनेल. झारखंड विधानसभा निवडणुकीबाबत जदयूमध्ये द्विंधा स्थिती निर्माण झालेली आहे. पक्षातील एक गट स्वबळावर ही निवडणूक लढवण्याचा आग्रह करत आहे.
अपक्ष आमदार सरयू राय आणि जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष व मुख्यमंत्री नितीशकुमार(Nitish Kumar) यांच्या भेटीनंतर स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. कारण, राय हे भाजपचे आमदारही होते. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री रघुवर दास यांचा अपक्ष म्हणून पराभव केला.
तेव्हापासून त्यांचे राजकारण भाजपविरोधात गेले. खीरू महतो यांनी झारखंडच्या 11 विधानसभा जागांची यादी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. झारखंड विधानसभा निवडणूक याचवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.