congress president election sarkarnama
देश

Congress President Election : काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी २२ वर्षांनंतर निवडणूक, अधिसूचना जारी

Congress President Election : अशोक गेहलोत, शशी थरुर यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर (Congress President Election) सगळ्याचे लक्ष आहे. या निवडणुकीबाबत आज (गुरूवारी) अधिसूचना काढण्यात आली. देशातील सर्वात जुना पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेस आज प्रारंभ झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवड समितीने ही अधिसूचना काढली आहे. (Congress President Election news update)

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, २४ ते ३० सप्टेंबर या दरम्यान अर्ज भरता येणार आहे. अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख ८ आँक्टोंबर आहे. निवडणूक बिनविरोध झाली नाही तर १७ आँक्टोंबर रोजी मतदान होणार आहे. १९ आँक्टोंबर रोजी निकाल लागणार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे दोन्ही जण निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, असे चित्र सध्या आहे. काल अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. यापूर्वी शशी थरुर यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.

हे दोन्ही नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर २२ वर्षांनंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. राहुल गांधी यांना अध्यक्षपदासाठी तयार करण्यासाठी कॉंग्रेसकडून प्रयत्न केला जात आहे, पण ते राहुल गांधी यांनी नकार दिला आहे.

शशी थरुर, अशोक, गेहलोत, मुकुल वासनिक यांच्यासह अजून काही जण अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. थरूर यांनी सोमवारी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. थरूर यांना पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास त्यांच्याकडून मंजुरी मिळाली आहे. सोनिया गांधी म्हणाल्या आहेत की, जर त्यांची थरूर यांची इच्छा असेल तर ते पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात. कोणीही निवडणूक लढवू शकतात, असे म्हटल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT