now shelf life of covishield vaccine is nine months from date of production
now shelf life of covishield vaccine is nine months from date of production  
देश

मोठी बातमी : 'सिरम'च्या कोव्हिशिल्ड लशीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून, आरोग्य यंत्रणांची धास्ती वाढली आहे. यामुळे कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. देशात अनेक राज्यांमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण अधिक आहे. यावर तोडगा काढण्यासाठी 'सिरम'ची कोव्हिशिल्ड ही लस उत्पादित तारखेपासून वापरण्याची मुदत सहा महिन्यांऐवजी नऊ महिने करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.  

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. देशात  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. 

कोरोना लशीकरणाचा वेग वाढवण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू असला तरी लस वाया जाण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अनेक राज्ये लशीचा तुटवडा असल्याची तक्रार करीत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने सिरमच्या कोव्हिशिल्ड लशीचा वापर करण्याची मुदत तीन महिन्याने वाढवली आहे. लशीच्या उत्पादित तारखेपासून ती सहा महिन्यांच्या आत वापरण्याचे बंधन आधी होते. आता ही मुदत नऊ महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. 

आफ्रिकेतील काही देशांध्ये या पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत पुरतील एवढे दशलक्ष डोस आहेत. त्यांची वापरण्याची मुदत न वाढवल्यास ते वाया जाणार आहेत. त्यामुळे वापरण्याची मुदत वाढवल्यास या देशांना फायदा होईल. मागील महिन्यात सिरमने औषध महानियंत्रक व्ही.जी.सोमानी यांच्याकडे लस वापरण्याची मुदत वाढवण्याची मागणी केली होती. कोव्हिशिल्ड विकसित करणाऱ्या अॅस्ट्राझेनेका कंपनीने ही लस सामान्य शीतकरण परिस्थितीत सहा महिने व्यवस्थित राहू शकते, असे नुकतेच स्पष्ट केले आहे. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली जात आहे. आता 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT