Narendra Modi  Sarkarnama
देश

Narendra Modi Cabinet : मोदी 3.0 सरकार; 'या' 30 कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ, पाहा यादी

Cabinet Minister Oath Ceremony : या मंत्रिमंडळात राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या अनुभवी नेत्यांचे स्थान कायम आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Modi 3.0 Government : दिल्लीतील राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर मोदींनी तिसऱ्या वेळेस पंतप्रधान झाली आहे. या केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांचा सहभाग असणार आहे. तर एकूण 30 जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

या मंत्रिमंडळात राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या अनुभवी नेत्यांचे स्थान कायम आहे. तर जे.पी. नड्डा, शिवराज सिंह आदी नवख्या नेत्यांनाही कॅबिनेटमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. या मंत्रिमंडळात पहिल्यांदा खासदार झालेल्यांनाही संधी देण्यात आलेचे दिसून येत आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यासह शपथ घेतलेल्या मंत्र्यांची नावे :

१.नरेंद्र मोदी

२.राजनाथसिंह

३.अमित शाह

४. नितीन गडकरी

५.जे.पी.नड्डा

६. शिवराजसिंह चौहान

७. निर्मला सीतारामण

८.एस.जयशंकर

९. मनोहरलाल खट्टर

१०. एच. डी. कुमारस्वामी

११. पीयूष गोयल

१२. धर्मेंद्र प्रधान

१३. जीतन राम मांझी

१४. राजीव रंजन सिंग

१५. सर्बानंद सोनवाल

१६. डॉ. वीरेंद्र कुमार

१७. राम मोहन नायडू

१८. प्रल्हाद जोशी

१९. जुएल उराव

२०. गिरीराज सिंह

२१. अश्विनी वैष्णव

२२. ज्योतिरादित्य शिंदे

२३. भूपेंद्र यादव

२४. गजेंद्र सिंह शेखावत

२५. अन्नपूर्णा देवी

२६. किरेन रिजीजू

२७. हरदीप सिंग पुरी

२८. मनसुख मांडविय

२९. जी. किशन रेड्डी

३०. चिराग पासवान

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT