Odisha CID Crime Branch IG Shefin Ahmed Passes Away sarkarnama
देश

IPS Officer Died : कर्करोगावर उपचार सुरू असतानाच IPS अधिकाऱ्याचं निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

IPS Officer Shefin Ahmed Passes Away : मूळ केरळचे असलेले आणि ओडिशा केडरचे आयपीएस अधिकारी शेफिन अहमद के. यांचे एका खासगी रुग्णालयात निधन झाले.

Aslam Shanedivan

IPS Officer Death : केरळचे मूळ रहिवासी असलेले आणि ओडिशा केडरचे आयपीएस अधिकारी असणारे शेफिन अहमद के. यांचे निधन झाले. ते येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. तर, बऱ्याच काळापासून ते कर्करोगावर उपचार घेत होते. शेफिन यांचे वय ५० वर्षे होते. दरम्यान, शेफिन अहमद यांच्या निधनानंतर पोलीस दलावर शोककळा पसरली असून, मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी शोक व्यक्त केला आहे.

२००३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी शेफिन अहमद यांनी ओडिशातील सीआयडी-क्राइम ब्रँचचे महानिरीक्षक (IG) म्हणून काम पाहिले होते. ते राज्यातील एका खासगी रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेत होते. त्यांचे वडील केरळमधील एक प्रमुख नेते आहेत.

सीटू (CITU) नेते हबीब यांचे पुत्र शेफिन अहमद यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षा पास होण्याआधी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. काही काळ त्यांनी प्रतिनियुक्तीवर आपल्या होमटाऊन केरळमध्ये देखील काम केले होते. तर, त्यांनी तिरुवनंतपुरम ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांच्यासह विविध पदांवर जबाबदारी पार पाडली होती.

दरम्यान, शेफिन अहमद यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी शोक व्यक्त केला आहे. CID, CB चे महानिरीक्षक आयपीएस अधिकारी शेफिन अहमद यांच्या अकाली निधनामुळे आपल्याला अत्यंत दुःख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, शेफिन अहमद यांनी ज्यासाठी आणि ओडिशा पोलिसांसाठी दिलेली समर्पित सेवा सदैव स्मरणात राहील. तर, शेफिन अहमद यांचे कुटुंबीय, सहकारी आणि आप्तेष्टांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करत, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना देखील मुख्यमंत्री माझी यांनी केली आहे.

अंत्यसंस्कार मंगळवारी होणार

दरम्यान, शेफिन अहमद यांचे पार्थिव सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत वट्टियूरकावू येथील त्यांच्या घरी नेले जाईल. त्यानंतर मंगळवारी अंत्यसंस्कारासाठी कोल्लममधील त्यांच्या मूळ गावी, ओचिरा येथे नेले जाणार आहे.

कर्करोगाचे निदान

२०२५ च्या सुरुवातीला शेफिन अहमद यांना कर्करोगाचे निदान झाले होते. तर, उपचारानंतर ते बरे देखील झाले होते. पण तीन ते चार महिन्यांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. ज्यानंतर त्यांच्यावर हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT