Congress, BJP and JDS
Congress, BJP and JDS  Sarkarnama
देश

असंही राजकारण! एका आमदाराचं मत काँग्रेसला तर दुसऱ्यानं कोरीच मतपत्रिका टाकली

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : राज्यसभेच्या निवडणुकीमुळं वातावरण तापलं आहे. यातच धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या एका आमदारानं काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केल असून, दुसऱ्या आमदारानं कोरी मतपत्रिका मतपेटीत टाकल्यानं खळबळ उडाली आहे. राज्यात तिसऱ्या जागेसाठी संख्याबळ नसतानाही भाजप, काँग्रेस आणि जेडीएसनं उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. (Rajya Sabha Election News)

कोलामधील जेडीएसचे आमदार के.श्रीनिवास गौडा यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं. गुब्बीतील जेडीएसचे आमदार एस.आर.श्रीनिवास यांनी कोरी मतपत्रिका मतपेटीत टाकली. यामुळं जेडीएसच्या गोटात चितेंचे वातावरण आहे. जेडीएसचे प्रमुख कुमारस्वामी यांनीही याला दुजोरा दिला आहे. जेडीएसनं माजी खासदार कुपेंद्र रेड्डी यांना मैदानात उतरवलं आहे. आमदारांनी गोंधळ घातल्याने जेडीएसच्या चिंतेत भर पडली आहे. आता याचा फायदा काँग्रेस की भाजपला होतो, याची उत्सुकता आहे.

कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे (BJP) दोन तर काँग्रेसचा (Congress) एक उमेदवार जिंकू शकतो. चौथ्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (JDS) या तिन्ही पक्षांनी या जागेवर उमेदवार उभे केल्याने वातावरण तापलं आहे. राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी उमेदवाराला ४५ मतांची गरज आहे. चौथ्या जागेसाठी भाजपकडे ३२, काँग्रेसकडे २४ अतिरिक्त मते तर जेडीएसकडे केवळ 32 आमदार आहेत.

चौथी जागा जिंकण्यासाठी पुरेशी मते नसतानाही तिन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस आणि जेडीएस या दोन प्रमुख विरोधी पक्षांपैकी कोणीही पराभव सहन करण्याच्या मानसिकतेत नाही. जेडीएसचे प्रमुख एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर घाणेरडे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या भीतीनं त्यांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये हलवले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT