ncc.jpeg
ncc.jpeg 
देश

देशाच्या सरंक्षणासाठी एक लाख एनसीसीचे छात्र..

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एनसीसीचा विस्तार करण्यात येणार आहे.  देशाच्या सरंक्षणासाठी एक लाख एनसीसी कॅडेट सीमेवर तैनात करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लाल किल्ल्यावरील भाषणात सांगितलं. देशाकडं वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना ठोस प्रत्युत्तर देण्यात येईल, असा सज्जड इशारा मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानचे नाव न घेता आज दिला. 

मोदी म्हणाले की एनसीसीच्या छात्रांना आता सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात येणार आहे. देशाच्या १७३ सीमा आणि समुद्र किनारी असलेल्या विविध जिल्ह्याच्या सीमेवर त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या मोहिमेत एक लाख एनसीसी छात्रांची निवड करण्यात येणार आहे. यात मुलींनाही समावेश करण्यात येणार आहे. लवकरत त्यांना याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लष्करी सीमेवर लष्कराचे जवान या मुलांना प्रशिक्षण देणार आहे, तर समुद्र किनारी नियुक्त केलेल्या एनसीसी छात्रांना नैादलातील जवान प्रशिक्षण देणार आहेत. हवाई दलाचे अधिकारीही या मुलांना प्रशिक्षण देणार आहेत. लष्करात करिअर करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी ही उत्तम संधी आहे. 
 
आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत, परदेशी गुंतवणूक, व्होकल-लोकल, कृषी क्षेत्र, पायाभूत सुविधा, आरोग्य, रोजगार आदी विषयांवर भाष्य केलं. कोरोना योद्धाचा मोंदीनी विशेष कैातुक केलं. कोरोना लस कधी येणार याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की देशभरात तीन कोरोना लशीवर सध्या संशोधन सुरू आहे.  लवकरच चाचणीनंतर ही लस उपलब्ध होईल, असे मोदींनी स्पष्ट केले. "आजपासून राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशनला सुरवात करण्यात येणार आहे.  देशातील प्रत्येकाला हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे. या माध्यमातून त्या व्यक्तीच्या  आरोग्याची माहिती त्यात असेल, असे मोदी यांनी आज सांगितले. "आपण किती दिवस कच्च्या माल आयात करत राहणार, आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागेल,"  असेही मोदी यांनी आज सांगितलं.  मोदी यांनी  सातव्यांदा लाल किल्ल्यावरून झेंडावंदन केले.  

मोदी म्हणाले, " आज नवीन संकल्प करण्याचा दिवस आहे. कोरोना काळात संकल्प करणं आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत हा देशासाठी मंत्र आहे.  आत्मनिर्भर बनणं सध्या आवश्यक आहे. देशातील जनता जो संकल्प करते तो जिद्दीने पूर्ण करते. माझा या देशातील तरूण आणि महिलांवर माझा पूर्ण विश्वास आहे. कृषी क्षेत्रात भारत आत्मनिर्भर झाला आहे, देशाला अधिक आत्मनिर्भर करण्यासाठी व्होकल आॅफ लोकलसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत देशाचं मोठ योगदान आहे." पायाभूत सुविधांसाठी ७ हजार प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ११० कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. मुलींच्या लग्नाबाबत काय वय असावे, यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे, असे मोदी यांनी सांगितले.   
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT