Rahul Gandhi Sarkarnama
देश

BJP leaders Letter to Rahul Gandhi : राहुल गांधींच्या "मोहब्बत की दुकान' ला भाजपचं सडेतोड उत्तर ;'नफरत का मेगामॉल'..

Rahul Gandhi Mohabbat ki Dukaan : लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांना इंदिरा गांधींनी कारागृहाच टाकलं होतं,

सरकारनामा ब्यूरो

New Delhi News : भारतीय जनता पक्षाच्या तीन नेत्यांनी काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहिलं आहे. राहुल गांधी यांच्या "मोहब्बत की दुकान'वर टीका करीत भाजप नेत्यांनी राहुल गांधी हे व्देषाचं विष पेरत असल्याचा आरोप या पत्रात केला आहे.

भाजप नेते राज्यवर्धन सिंह राठोर, पूनम महाजन आणि प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी राहुल गांधींना पत्र लिहिलं आहे. काँग्रेसच्या राज्यात झालेल्या दंगली, गांधी-नेहरु परिवाराने काँग्रेसच्या काही नेत्यांवर केलेले अन्याय, देशातील नेत्यांबाबत केलेले वादग्रस्त विधान यावरुन भाजप नेत्यांनी या पत्रातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

'मोहब्बत की दुकान' का 'नफरत का मेगामॉल' असे शीर्षक या पत्राला देण्यात आले आहे. परदेशात भारताच्या विरोधात अपप्रचार पसरविण्याचे काम राहुल गांधी करीत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. इतिहासात डोकावून पाहाल तर आपल्याला दिसेल की आपल्या परिवाराने व्देषाचा मेगामॉल उघडला असल्याचे तुम्हाला दिसेल, असे भाजपनं पत्रात राहुल गांधींना सुनावलं आहे.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी देशात आणीबाणी लागू करुन १९ महिने आपल्या हातात लोकशाहीला कैद करुन ठेवलं होते. लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांना इंदिरा गांधींनी कारागृहाच टाकलं होतं, अशी खंत भाजपने या पत्रातून व्यक्त केली आहे.

राहुल गांधींच्या इंग्लंड आणि अमेरिका दौ-यादरम्यान त्यांनी भारतातल्या राजकीय परिस्थितीबद्दल मोकळेपणानं मतं व्यक्त केली. त्यात त्यांनी देशांतर्गत लोकशाही, मोदी सरकार, रा.स्व.संघाची भूमिका, भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध यावर टीकात्मक भाष्य केलं.

भाजपानं राहुल यांच्या या परदेश दौ-याबद्दल सातत्यानं ही भूमिका मांडली की ते परदेशात जाऊन भारताच्या प्रतिमेला हानी पोहोचवत आहेत.

कॉंग्रेस सतत प्रत्युत्तरादाखल विचारत राहिली की मोदींनी यापूर्वी परदेशात केलेल्या भाषणांमध्ये अशा प्रकारची टीका नव्हती का? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT